संध्याकाळच्या नाश्ता खास करण्यासाठी 'हा' हेल्दी पदार्थ ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 06:21 PM2019-02-14T18:21:26+5:302019-02-14T18:23:01+5:30

संध्याकाळी केलेला हलका नाश्ता शरीराला एनर्जी मिळण्यासाठी मदत करतो. तसेच हा नाश्ता मूड फ्रेश करण्यासाठीही मदत करतो. दुपारच्या जेवणापासून ते रात्रीच्या जेवणामधील वेळ तुम्ही हेल्दी आणि टेस्टी करू शकता.

These healthy snacks made from potatoes will increase the taste of evening time | संध्याकाळच्या नाश्ता खास करण्यासाठी 'हा' हेल्दी पदार्थ ट्राय करा!

संध्याकाळच्या नाश्ता खास करण्यासाठी 'हा' हेल्दी पदार्थ ट्राय करा!

googlenewsNext

संध्याकाळी केलेला हलका नाश्ता शरीराला एनर्जी मिळण्यासाठी मदत करतो. तसेच हा नाश्ता मूड फ्रेश करण्यासाठीही मदत करतो. दुपारच्या जेवणापासून ते रात्रीच्या जेवणामधील वेळ तुम्ही हेल्दी आणि टेस्टी करू शकता. कारण आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक हटके रेसिपी सांगणार आहोत. 

बटाट्याचे फायदे :

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बटाट्यापासून तयार करण्यात आलेल्या रेसिपी ट्राय करू शकता. बटाटा एक असा पदार्थ आहे, जो सर्रास घरामध्ये आढळतो. तसेच यापासून अनेक स्वादिष्ट पदार्थही तयार करता येतात. बटाट्यामध्ये कॅल्शिअम, लोह, व्हिटॅमिन-बी तसेच फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतं. बटाट्याचा आहारात समावेश केल्याने रक्त वाहिन्या लवचिक होतात. त्यामुळे बटाट्याचा समावेश आहारात केल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. एखादा पाहुणा आला असेल तर झटपट एखादा पदार्थ तयार करण्यासाठी बटाट्याचा वापर करता येऊ शकतो. 

जाणून घेऊया बटाट्यापासून हेल्दी स्नॅक्स तयार करण्याती रेसिपी...

साहित्य :

  • दोन उकडलेले बटाटे
  • लाल मिरची पावडर
  • काळी मिरी पावडर
  • चाट मसाला
  • पोह्यांची पावडर 
  • मीठ चवीनुसार

कृती :

-  दोन उकडलेल्या बटाट्यांची साल काढून स्मॅश करून त्यामध्ये मसाला आणि मीठ एकत्र करा. 

- त्यानंतर एका बाउलमध्ये बारिक केलेले पोहे घेऊन त्यामध्ये बटाट्यांचं मिश्रण एकत्र करून घ्या.

- पोहे एकत्र कराताना लक्षात घ्या की, मिश्रणातील ओलावा कमी होइल एवढेच एकत्र करा.

- तयार मिश्रणाचे गोळे करून एका प्लेटमध्ये ठेवा.

- गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करत ठेवा.

- तेल गरम झाल्यानंतर तयार गोळे डिप फ्राय करा. 

- सोनेरी होइपर्यंत तळून घ्या.

- बटाट्यापासून तयार करण्यात आलेलं हेल्दी स्नॅक्स खाण्यासाठी तयार आहे.

- तुम्ही सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करू शकता.

Web Title: These healthy snacks made from potatoes will increase the taste of evening time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.