पुण्यात अवघ्या ३० रुपयांत मिळतात हे पदार्थ !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 08:03 AM2018-10-26T08:03:01+5:302018-10-26T08:03:01+5:30

पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. याच वचनाला जागत आम्ही देत आहोत पुण्यात ३० रुपयांच्या आत मिळणाऱ्या प्रसिद्ध पदार्थांची यादी . 

these food item available only in 30 rupies at Pune | पुण्यात अवघ्या ३० रुपयांत मिळतात हे पदार्थ !

पुण्यात अवघ्या ३० रुपयांत मिळतात हे पदार्थ !

googlenewsNext

पुणे : पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. याच वचनाला जागत आम्ही देत आहोत पुण्यात ३० रुपयांच्या आत मिळणाऱ्या प्रसिद्ध पदार्थांची यादी . 

चॉकलेट पान : चॉकलेट पान हा पुण्यात तरुणाईला आवडणारा पदार्थ आहे. मसाला पानामध्ये चॉकलेट यामुळे मुखशुद्धीसोबत डेझर्टचा आनंदही या पदार्थामधून मिळतो. पुण्यातील एफ सी रस्ता, पौड रस्त्यावर हा प्रकार अधिक प्रमाणात मिळतो. 

 

बॉबे मसाला टोस्ट : विमाननगर भागात मिळणारे हे मसाला टोस्ट भन्नाट चवीचे आहेत. सालसा  स्वीट विमाननगर भागात मिळणारे हे टोस्ट चॉकलेट. चीज आणि शेजवान फ्लेवरमध्ये येतात. इथे खवैय्यांची गर्दी कायम दिसते. 

 

गार्डन वडा पाव :पुण्यात प्रसिद्ध असलेला गार्डन वडापाव आता कॅम्प व्यतिरिक्त दोन ते तीन ठिकाणी मिळतो. १५ रुपयात मिळणाऱ्या या जंबो वडापावमुळे पोट भरल्यासारखे जाणवते. 

 

शेगाव कचोरी :शेगाव कचोरी हा हा बऱ्याच जणांचा आवडता पदार्थ आहे. गरमागरम कचोरी  आणि सोबत चटकदार लसणाची चटणी पुन्हा-पुन्हा खावी अशीच आहे. 

 

 पाव पॅटिस : पावात बटाट्याची भाजी घालून डाळीच्या पिठाच्या आवरणातून तळून काढले जातात. त्रिकोणी आकाराचे पाव पॅटिस चिंचेची चटणी, हिरवी चटणी, कांदा आणि शेव, कोथिंबीर घालून सर्व्ह केले जाते. 

 

रेनबो पाणीपुरी :रेनबो पाणीपुरी हा चवदार पदार्थ पुण्यात मिळतो. यात रेग्युलरसोबत, ,पुदिना , लसूण, जीरा आणि फ्लेवरमध्ये पाणीपुरी मिळते. चटकदार आणि वेगळ्या पाणीपुरीचा हा अनुभव घेण्यासारखाच आहे. 

Web Title: these food item available only in 30 rupies at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.