आपल्या देशातील काही कॉलेजेस तेथील कॅण्टिनमुळेही फेमस आहे.. असं काय मिळतं तिथे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 05:50 PM2017-11-21T17:50:55+5:302017-11-21T18:05:33+5:30

आठवणीतलं कॉलेज कॅन्टीन आठवतं ते तिथे केलेल्या मौजमस्तीमुळे. पण देशात असे अन्य कॉलेज कॅन्टीन्सही आहेत जे त्यांच्या खास चवीसाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड फेमस आहेत. कॉलेज लेक्चर्स बंक करु न या कॅन्टीनमध्ये जाणा-यासाठी नेमकं या कॅन्टीनमध्ये मिळतं तरी काय? हे जाणून घेणं मोठं मजेशीर आहे.

Some of our colleges in our country are also famous because of Cantin. What is special there? | आपल्या देशातील काही कॉलेजेस तेथील कॅण्टिनमुळेही फेमस आहे.. असं काय मिळतं तिथे?

आपल्या देशातील काही कॉलेजेस तेथील कॅण्टिनमुळेही फेमस आहे.. असं काय मिळतं तिथे?

Next
ठळक मुद्दे* चॉकलेट फ्रॅपे आणि ग्रिल्ड सॅण्डविच हे दिल्ली येथील हंसराज महाविद्यालयाच्या कॅन्टीनचं फेव्हरिट कॉम्बिनेशन आहे. तसेच स्प्रिंग रोल्स, समोश्यासाठी देखील हे कॅन्टीन हिट आहे.* ख्राइस्ट युनिव्हर्सिटी  बंगळुरु या कॅन्टीनमधील मँगो मिल्कशेक फेवरिट मेन्युच्या यादीत टॉपवर आहे.* नवी दिल्ली येथील सेंट स्टिफन्स कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चीज घातलेले स्क्र म्बल्ड एग, टोस्ट, चिकन, सॅण्डविचेस, समोसा, पकोडे, चिकन करी या पदार्थांची चव चाखण्यासाठी बरखा दत्त, कोंकणा सेन यांसारखे मान्यवर नेहमी गर्दी करत असत.

 




सारिका पूरकर-गुजराथी



कॉलेज कॅन्टीन. नुसतं नाव काढताच आपल्या अनेकांच्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. कॉलेज म्हणजे विद्यार्थीदशेतली स्वातंत्र्याची पहिली पायरी असते. या कॉलेज जीवनाच्या अनेक रम्य आठवणी याच अनेकांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणीही बनून जातात. नवीन मित्र-मैत्रिणी, नवी उमेद, नवी स्वप्नं, नवी मजा-मस्ती हे सर्व कॉलेज देत असले तरी हे मिळण्याचे ठिकाण म्हणजे सर्वांसाठी एकच असते, ते म्हणजे कॉलेजचं कॅन्टीन. या कॅन्टीनमध्ये बसून मित्र-मैत्रिणींबरोबर फस्त केलेले समोसे, सॅण्डविचेस, कचोरी, दाबेली, डोसे-वडे ,बर्गर्स यांच्या चवी आजही जिभेवर रेंगाळत असणार. जोडीला गरमागरम चहाचे कपही आठवत असतील.

आठवणीतलं कॉलेज कॅन्टीन आठवतं ते तिथे केलेल्या मौजमस्तीमुळे. पण देशात असे अन्य कॉलेज कॅन्टीन्सही आहेत जे त्यांच्या खास चवीसाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड फेमस आहेत. कॉलेज लेक्चर्स बंक करु न या कॅन्टीनमध्ये जाणा-यासाठी नेमकं या कॅन्टीनमध्ये मिळतं तरी काय? हे जाणून घेण्यासाठी ही एक सैर..

1) मिठीबाई महाविद्यालय, मुंबई

मुंबईचं महाविद्यालय असल्यामुळे मुंबईत सर्वाधिक खपानं विकला जाणारा वडापाव येथेही जाम फेमस आहे. शिवाय या कॅॅन्टीनच्या वडापावची चवही भन्नाट आहे. शिवाय इथला डोसाही विद्यार्थी चवीचवीनं खातात. जोडीला पाणीपुरी, ग्रिल्ड सॅण्डविच, टोस्ट यांच्याही व्हरायटी या कॅन्टीनमध्ये मिळतात. सॅण्डविच देखील या कॅन्टीनचा सिग्नेचर मेनू आहे. चीजी पावभाजी, व्हेज क्रिस्पी हे देखील एकदम स्पेशल मिळतं इथे!

 

2) हंसराज महाविद्यालय, दिल्ली

चॉकलेट फ्रॅपे आणि ग्रिल्ड सॅण्डविच हे या कॅन्टीनचं फेव्हरिट कॉम्बिनेशन आहे. तसेच स्प्रिंग रोल्स, समोश्यासाठी देखील हे कॅन्टीन हिट आहे. स्नॅक्स, कटलेट्स, पॅटिस, मफिन्स या पदार्थांचीही भरपूर चॉईस विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध आहे.

 

3) ख्राईस्ट युनिव्हर्सिटी  बंगळुरु

या कॅन्टीनमधील मँगो मिल्कशेक फेवरिट मेन्युच्या यादीत टॉपवर आहे. तसेच शाकाहरी आणि मांसाहरी असे दोन प्रकारचे पदार्थ या कॅन्टीनमध्ये दिले जातात. उत्तर भारतीय पद्धतीच्या पदार्थांची येथे रेलचेल पाहायला मिळते. केक, डोनट्स, समोसा, एग पफ्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चहासाठी येथे विद्यार्थ्यांची झुंबड उडते.

 

4) हिंदू महाविद्यालय,दिल्ली

या कॅन्टीनची खासियत म्हणजे पोटभरीच्या पदार्थांसाठी ते ओळखले जातं. विद्यार्थ्यांंना विविध चवींचे पराठे तसेच दिल्ली, पंजाबकडे आवडीनं खाल्ले जाणारे राजमा-चावल हा मेनू या कॅन्टीनची शान आहे. त्याचबरोबर भेलपुरी, पाणीपुरी आणि अन्य चाटचे पदार्थही येथे सर्व्ह केले जातात. ब्रेड आॅम्लेट , शाही पनीर यांसारखे पौष्टिक पदार्थ देखील या कॅन्टीनची विशेष चव म्हणून ओळखले जातात.

5) जादवपूर युनिर्व्हसिटी, कोलकाता

मिलन कांती देज कॅन्टीन म्हणून याची ख्याती आहे. बंगाली चवीचा मेळ या कॅन्टीनच्या मेन्युत आहे. तसेच मांसाहरी पदार्थांची राजधानी म्हणून हे फेमस आहे. चिकन पकोडा, चिकन स्ट्य, चॉप, रोल हे या कॅन्टीचे फेवरिट मेनू. शाकाहरी पदार्थांमध्येही बंगाली टच आहे. घुगनी, आलू दम, लुची, नूडल्स, बर्गर्स, दालपुरी यांची चव देखील अफलातून आहे.

6) स्टिफन्स कॅफे, नवी दिल्ली

सेंट स्टिफन्स कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चीज घातलेले स्क्र म्बल्ड एग, टोस्ट, चिकन, सॅण्डविचेस, समोसा, पकोडे, चिकन करी या पदार्थांची चव चाखण्यासाठी बरखा दत्त, कोंकणा सेन यांसारखे मान्यवर नेहमी गर्दी करत असत. यावरूनच या कॅन्टीनची खासियत वेगळी सांगायला नको.

 

7) सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई

या कॅन्टीनमध्ये फास्ट फूडऐवजी पौष्टिक आणि पोटभरीच्या पदार्थांवर भर दिला जातो. येथील व्हेज फ्रँकीस, भेलपुरी या चवी मस्ट ट्राय अशा आहेत. चीज ओनियन डोसा, सॅण्डविचच्या भरपूर चवी, मिल्कशेक, आइस्ड टी या काही भन्नाट चवी देखील मेन्यूकार्डवर फेवरिट म्हणून नोंदल्या गेल्या आहेत.

8) कमला नेहरु कॉलेज, दिल्ली

दिलवालों की व खानेवालों की दिल्ली म्हणून या शहराची ओळख या कॅन्टीननेही जपली आहे. अस्सल देसी चवीचे पदार्थ असूनही विद्यार्थी त्यावर ताव मारतात. छोले भटुरे, राजमा -चावल हे दोन पदार्थ तर मिनिटात फस्त होतात. तसेच पापडी चाट, चीज मॅॅक्रोनी, मोमोज, चायनीज चाट, पाणीपुरी ही व्हरायटीही जोडीला आहे.

 

9) सोफिया कॉलेज, मुंबई

स्प्रिंग डोसा आणि चिकन फ्राईड राइससाठी या कॅन्टीनची ख्याती मुंबापुरीत आहे.

 

Web Title: Some of our colleges in our country are also famous because of Cantin. What is special there?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.