मुलांना ब्रेड-जॅम खाऊ घालत असाल, तर वेळीच सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 06:41 PM2019-03-04T18:41:53+5:302019-03-04T18:47:58+5:30

मुलांना न्हाऊ-माखू घालताना पालकांना प्रचंड कसरत करावी लागते. पालक अनेकदा हैराण होतात की, नक्की यांना पौष्टिक असं द्यावं तर काय द्यावं? कारण मुलं कधी काय खाण्याचा हट्ट धरतील हे सांगता येत नाही.

Side effects of kids eating bread jam all the time | मुलांना ब्रेड-जॅम खाऊ घालत असाल, तर वेळीच सावध व्हा!

मुलांना ब्रेड-जॅम खाऊ घालत असाल, तर वेळीच सावध व्हा!

Next

(Image Credit : Bread Maker Solutions)

मुलांना न्हाऊ-माखू घालताना पालकांना प्रचंड कसरत करावी लागते. पालक अनेकदा हैराण होतात की, नक्की यांना पौष्टिक असं द्यावं तर काय द्यावं? कारण मुलं कधी काय खाण्याचा हट्ट धरतील हे सांगता येत नाही. अनेकदा जंक फूड खाण्यासाठी ते पालकांना नकोस करून सोडतात. अशातच जर त्यांना घरात तयार केलेलं पदार्थ खाण्याचा आग्रह धरला तर नाक-तोंड मुरडण्यास सुरुवात करतात. परंतु एक पदार्थ असा आहे, जो मुलं कंटाळा न करता खाण्याची तयारी दर्शवतात. तो पदार्थ म्हणजे, बाजारामध्ये मिळणारा जॅम. 

खरचं जॅम मुलांसाठी हेल्दी असतो का?

ब्रेड जॅम, जॅम चपाती, जॅम बिस्किट हे काही असे ऑप्शन्स आहेत, जे मुलं नाश्ता, दुपारचं जेवणं किंवा रात्रीच्या जेवणात अगदी सहज खातात. फक्त मुलांसाठीच नाही तर आई-वडिलांसाठीही हे बेस्ट आणि अगदी सहज तयार करता येण्याजोगे ऑप्शन्स आहेत. कारण हे तयार करण्यासाठी जास्त महनत लागत नाही. परंतु खरचं जॅम हेल्दी आहे का? टिव्हीमध्ये दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये सांगण्यात येतं की, जॅममध्ये फ्रूट्स असतात, न्यूट्रिएंट्स असतात एवढचं नाही तर जॅम मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत हेल्दी असतात. परंतु खरचं असं असतं का? 

(Image Credit : boatcafe.co.nz)

2 चमचा साखरेबरोबर एक चमचा जॅम

एक चमचा जॅम 2 चमचा साखरेच्या प्रमाणाएवढा असतो. जॅममध्ये फळं असल्याचा दावा अनेक कंपन्यांकडून करण्यात येतो. खरं तर जॅम तयार करण्यासाठी फळं उकळून त्यामध्ये साखर एकत्र करण्यात येते. फळं उकळल्यानंतर त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होतं आणि फळांमध्ये असलेली पोषक तत्वही नष्ट होतात. काही फळांमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असेल तर जॅम तयार करताना हे पूर्णपणे नष्ट होऊन जातं. 

लठ्ठपणाचा धोका

अशी मुलं ज्यांना जॅम खाण्याची सवय असते आणि जे नियमितपणे जॅमचं सेवन करतात. त्यांच्यामध्ये लठ्ठपणासोबतच हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. असं होण्यामागील कारण म्हणजे, जास्त जॅम खाल्याने तुम्ही गरजेपेक्षा जास्त कॅलरीजचे सेवन करत असता. 

(Image Credit : America's Test Kitchen)

हेल्दी पदार्थ खात नाहीत मुलं

फक्त जॅम नाही तर केचअप आणि इतर प्रिजर्व्ड पदार्थांमध्ये साखरचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळेच हे मुलांना फार आवडतात. अशाप्रकारचे पदार्थ मेंदूपर्यंत खोटा संकेत पोहोचवतात की, पोट भरलेलं आहे आणि यामुळे मुलं जेवणाला नाक-तोंड मुरडतात. तसेच त्यांची मनापासून जेवण्याची इच्छा होत नाही. 

Web Title: Side effects of kids eating bread jam all the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.