आईस्क्रीम की पान नो कन्फ्युजन : असं बनवा पान आईस्क्रीमचं फ्युजन !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:46 PM2019-05-06T13:46:31+5:302019-05-06T14:29:10+5:30

जिव्हा तृप्त करणारे हे पान आईस्क्रीम घरी नक्की करून बघा. 

Recipe of Pan Ice-cream | आईस्क्रीम की पान नो कन्फ्युजन : असं बनवा पान आईस्क्रीमचं फ्युजन !

आईस्क्रीम की पान नो कन्फ्युजन : असं बनवा पान आईस्क्रीमचं फ्युजन !

Next

पुणे : वाढत्या उन्हात थंडावा देण्यासाठी सगळ्यांची पावले आईस्क्रीमकडे वळतात. काहीवेळा जेवण झाल्यावर पान खायचं की आईस्क्रीम असे कन्फ्युजन होते. अशावेळी दोन्हींचा  आनंद एकाचवेळी लुटायचा असेल तर पान आईस्क्रीमला पर्याय नाही. तेव्हा जिव्हा तृप्त करणारे हे पान आईस्क्रीम घरी नक्की करून बघा. 

साहित्य :

  • दोन वाटी दूध, 
  • दोन वाटी क्रीम(साय),
  •  पाऊण वाटी साखर 
  • पाऊण वाटी मिल्क पावडर 
  •  एक चमचा भाजलेली बडिशेप
  • दोन चमचे गुलकंद 
  • अर्धा चमचा वेलचीपूड
  •  सहा विड्याची पानं  
 

कृती : दोन वाटी दूध, दोन वाटी क्रीम(साय), पाऊण वाटी साखर , पाऊण वाटी मिल्क पावडर हे सर्व  साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत फिरवा

आता मिक्सरच्या भांडयात  एक चमचा भाजलेली बडिशेप, दोन चमचे गुलकंद, अर्धा चमचा वेलचीपूड आणि सहा विड्याची पानं दोन चमचा दूध घालून एकजीव करून फिरवा. 

तयार मिश्रणात पानाची पेस्ट घालून आईस्क्रीम भांड्यात सेट करायला ठेवा 

सहा ते सात तास आईस्क्रीम डीप फ्रीज झाल्यावर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात फिरवून आठ ते नऊ तास फ्रीजमध्ये सेट करा. 

टूटीफ्रूटी आणि चेरी घालून पान आईस्क्रीम सर्व्ह करा. 

Web Title: Recipe of Pan Ice-cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.