रेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 04:50 PM2018-12-10T16:50:06+5:302018-12-10T16:51:17+5:30

पालेभाज्यांमध्ये समाविष्ट होणाऱ्या मेथीच्या भाजीमध्ये अनेक औषधी तत्त्व आढळून येतात. मेथीपासून भाजी, पाराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात.

Recipe of methi aloo | रेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू!

रेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू!

googlenewsNext

पालेभाज्यांमध्ये समाविष्ट होणाऱ्या मेथीच्या भाजीमध्ये अनेक औषधी तत्त्व आढळून येतात. मेथीपासून भाजी, पाराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. याचे शरीरालादेखील अनेक फायदे होतात. पण घरी एकाच पद्धतीने तयार केली जाणारी मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो. अशातच तुम्ही वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी तयार करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही नवीन हटके रेसिपी ट्राय करू शकता. जाणून घेऊया रेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू तयार करण्याची रेसिपी...

साहित्य : 

  • 1 मेथीची जुडी
  • 5 ते 6 बटाटे
  • 1 आल्याचा तुकडा
  • 1 चमचा जिरं
  • 4 ते 5 मिरच्या
  • तिखट
  • मीठ चवीनुसार
  • हळद व तेल

 

कृती : 

- मेथी बारीक चिरून घ्यावी. 

- बटाटा उकडून सोलून त्याचे लहान लहान चौकोनी तुकडे करावेत. 

- मिरच्या व आल्याचा ठेचा करुन घ्यावा. तेलाची फोडणी द्यावी.
 
- त्यावर बटाट्याच्या फोडी घालून मंद आचेवर जरा परतून घ्याव्यात. 

- त्यावर वाटलेल्या मिरची आल्याचा ठेचा, तिखट, मीठ घालून परतून उतरवावे. 

- झाकण ठेवून वाफेवर अर्धवट शिजवून घ्यावेत. नंतर त्यात मेथी घालून भाजी शिजवून घ्यावी.

Web Title: Recipe of methi aloo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.