पावसाळी हवेत करा अशी गरमागरम दाल-खिचडी !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:17 PM2019-04-15T18:17:50+5:302019-04-15T18:19:26+5:30

कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी आणि चवदार दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे. चला तर बघूया या पदार्थाची पाककृती. 

Recipe of Dal Khichadi | पावसाळी हवेत करा अशी गरमागरम दाल-खिचडी !

पावसाळी हवेत करा अशी गरमागरम दाल-खिचडी !

Next

पुणे : अवकाळी पावसामुळे सध्या पुण्यात गारवा  निर्माण झाला आहे. अशावेळी गरमागरम दाल- खिचडी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. फक्त पावसाळ्यात नाही तर कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी आणि चवदार दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे. चला तर बघूया या पदार्थाची पाककृती. 

साहित्य :

तांदूळ कोणताही (शक्यतो जुना घ्या)

तुरीची डाळ पाव वाटी 

तूप किंवा तेल (आवडीनुसार)

हळद 

मोहरी 

जिरे 

हिंग 

लसूण पाकळ्या आठ ते दहा 

कढीपत्ता 

कोथिंबीर 

मीठ 

दोन लाल मिरच्या 

पाणी 

कृती :

  • तांदूळ आणि डाळ दोनवेळा पाण्यात धुवून १० मिनिट वेगवेगळे भिजवा. 
  • गॅसवर तीन वाट्या पाणी उकळून घ्या. 
  • चमचाभर तेल किंवा तुपात तांदूळ आणि डाळ परतून घ्या. 
  • आत त्यात चिमूटभर हळद आणि दोन लहान चमचे मीठ घाला. 
  • आता ही खिचडी तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या. 
  • ही खिचडी पळीने घोटून एकजीव करून घ्या. 
  • पळीमध्ये आवडीनुसार तेल किंवा तूप घालून गरम करा. 
  • त्यात मोहरी तड्तडवून घेऊन जिरे घाला. 
  • आता त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता आणि निम्मी कोथिंबीर चिरून घाला. 
  • आता या फोडणीत पाव चमचा हिंग घाला आणि जळण्याच्या आधी ही फोडणी खिचडीवर घाला. 
  • आता उरलेली कोथिंबीर घालून सजवून सर्व्ह करा 'पौष्टिक दाल-खिचडी'. 

Web Title: Recipe of Dal Khichadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.