Recipe of almond chocolate balls | बाजारातील मिठाईंना करा बाय-बाय; आता घरीच तयार करा बदाम चॉकलेट्स बॉल्स
बाजारातील मिठाईंना करा बाय-बाय; आता घरीच तयार करा बदाम चॉकलेट्स बॉल्स

बदाम चॉकलेट्स बॉल्स एक फार चविष्ट रेसिपी आहे. जी तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता. तसं पाहायला गेलं तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. ही मिठाई तयार करायला इतकी सोपी आहे की, तुम्ही कधीही अगदी सहज तयार करू शकता. ही सोपी रेसिपी घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून तयार करता येऊ शकते. 

साहित्य :

  • 1 कप बादामाचे काप
  • 1 कप बारीक साखर
  • 3-4 टेबलस्पून खोबरं
  • 2 टेबलस्पून कोको पावडर
  • 1 टेबलस्पून बटर
  • पाणी आवश्यकतेनुसार
  • 1 टी स्पून व्हेनिला इसेंस

 

कृती :

- ही स्वीट डिश घरी तयार करणं फार सोपं आहे. त्यासाठी सर्वात आधी एका छोट्या पॅनमध्ये बदामाची पावडर आणि किसलेलं खोबर भाजून घ्या. 

- दुसऱ्या पॅनमध्ये साखर आणि पाणी एकत्र करून पाक तयार करा. आता यामध्ये बदामाची पावडर, बटर आणि कोको पावडर एकत्र करा. त्यानंतर त्यामध्ये व्हेनिला इसेंसही एकत्र करा.
 
- हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून समान मिश्रण तयार करा. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण सामान्य तापमानामध्ये येईपर्यंत थंड करून घ्या. 

- आता हाताला थोडं तूप लावा आणि तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तयार करा. तयार बॉल्स किसलेल्या नारळाच्या किसामध्ये घोळून घ्या. 

- तुमची हटके स्वीट डिश बदाम चॉकलेट बॉल्स तयार आहेत. हे सर्व्ह करा

- तुम्ही हे बदाम चॉकलेट्स बॉल्स रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 


Web Title: Recipe of almond chocolate balls
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.