तांदळाच्या पिठाचे गोड गोड घावनं!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 06:24 PM2018-12-04T18:24:57+5:302018-12-04T18:26:30+5:30

सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभराच्या रूटिनसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो, असं आपण नेहमी ऐकतो. सकाळचा नाश्ता पोटभर केल्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते. अशातच रोज नाश्त्याला तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो.

Receipe of sweet pancakes or tandalache goad ghavan | तांदळाच्या पिठाचे गोड गोड घावनं!

तांदळाच्या पिठाचे गोड गोड घावनं!

Next

सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभराच्या रूटिनसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो, असं आपण नेहमी ऐकतो. सकाळचा नाश्ता पोटभर केल्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते. अशातच रोज नाश्त्याला तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तुम्हीही रोजच्याच पदार्थांना कंटाळला असाल आणि एखादा हटके पदार्थ खाण्यासाठी शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. आपण साधारणतः तांदळाचे डोसे किंवा तांदळाचे घावन नाश्त्यासाठी तयार करतो. पण हेच घावन थोड्या हटके पद्धतीने करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही गुळ वापरू शकता. जाणून घेऊया तांदळाचे गोड घावण तयार करण्याची रेसिपी...

साहित्य :

  • ३/४ कप तांदळाचे पिठ
  • अर्धा कप गुळ
  • अर्धा कप ओलं खोबरं
  • चवीनुसार मीठ
  • पिठ भिजवण्यासाठी पाणी
  • तूप

 

कृती :

- तांदळाचे पिठ, गुळ, खोबरं, मीठ आणि पाणी एकत्र करून त्यामध्ये गुळ विरघळून घ्यावा. 

- पिठ जास्त पातळ करू नये. 

- डोशाचा पॅन किंवा नॉन स्टिक पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवावा. 

- त्यावर तूप लावून पिठ पसरवून घ्यावे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ काढावी. 

- झाकण काढून दोन्ही बाजूंनी घावन खरपूस भाजून घ्यावे. 

- खोबऱ्याच्या चटणीसोबत किंना कैरीच्या लोणच्यासोबत गरम गरम घावन सर्व्ह करावे. 

Web Title: Receipe of sweet pancakes or tandalache goad ghavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.