थंडा थंडा कूल कूल फ्रूट पंच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 06:05 PM2019-03-02T18:05:19+5:302019-03-02T18:06:40+5:30

सध्या वातावरणामध्ये बदल होत आहेत. थंडी हळूहळू कमी होत असून उष्णता वाढत आहे. अशातच दुपारच्या कडाक्याच्या उन्हाने सर्वचजण हैराण होतात. उन्हातून आल्यावर शरीराला गारवा मिळण्यासाठी थंड पदार्थांची आवश्यकता असते.

Receipe of cool fruit punch | थंडा थंडा कूल कूल फ्रूट पंच!

थंडा थंडा कूल कूल फ्रूट पंच!

Next

(Image Credit : allrecipes.co.uk)

सध्या वातावरणामध्ये बदल होत आहेत. थंडी हळूहळू कमी होत असून उष्णता वाढत आहे. अशातच दुपारच्या कडाक्याच्या उन्हाने सर्वचजण हैराण होतात. उन्हातून आल्यावर शरीराला गारवा मिळण्यासाठी थंड पदार्थांची आवश्यकता असते. अनेकदा आपण थंड पाण्याने काम चालवतो पण त्याऐवजी जर एखादं हटके आणि हेल्दी असं ड्रिंक पिण्यासाठी मिळालं तर बात काही औरच... तुम्ही अशाच थंडगार पदार्थाच्या शोधात असाल तर तुम्ही घरीच फ्रूट पंच तयार करू शकता. फळांचा वापर करून तयार केलेलं फ्रूट पंच आरोग्यासाठीही उत्तम ठरतं. जाणून घेऊया फ्रूट पंच तयार करण्याची रसिपी आणि कृती...

साहित्य :

  • थंड पाणी
  • अर्धा किलो साखर
  • 2 कप संत्र्याचा रस
  • 1 कप लिंबाचा रस
  • 2 कप अननसाचा रस

 

कृती :

- सर्वात आधी तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात साखर आणि पाणी एकत्र करून 10 मिनिटांसाठी उकळून घ्यावे.

- मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये रस एकत्र करून फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्या.

- आता जेव्हाही तुम्ही उन्हातून वैतागून याल त्यावेळी फ्रिजमध्ये ठेवलेल्या मिश्रणात थंडगार पाणी घालून सर्व्ह करा. 

- थंड थंड फ्रूट पंच.

टिप : फ्रूट पंच तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या फळांचाही वापर करू शकता. 

Web Title: Receipe of cool fruit punch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.