Receipe of carrot milk powder burfi | घरीच तयार केलेली पौष्टिक गाजर बर्फी खा अन् मैद्याच्या मिठाईपासून दूर राहा
घरीच तयार केलेली पौष्टिक गाजर बर्फी खा अन् मैद्याच्या मिठाईपासून दूर राहा

हिवाळा म्हणजे लाल-लाल गाजरांचा महिना असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. या दिवसांमध्ये बाजारामध्ये गाजरांची आवाक वाढते. त्यामुळे घराघरांमध्ये गाजराच्या हलव्याचा बेत असतो. तुम्हीही गाजरापासून तयार होणाऱ्या हटके रेसिपी शोधत असाल तर आमच्याकडे एक रेसिपी आहे. जाणून घेऊया गाजर मिल्क पावडर बर्फी तयार करण्याची रेसिपी...

साहित्य :

  • 5 ते 6 गाजर
  • 2 टेबलस्पून घी
  • 3/4 कप साखर
  • 1/2 टीस्पून गुलाब पाणी
  • 1 कप मिल्क पावडर
  • 1 टीस्पून वेलची पावडर
  • 1 लीटर दूध
  • 2 ते 3 टेबलस्पून बारीक कापलेले बादाम

 

कृती :

- एका पॅनमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा.

- गाजरं स्वच्छ धुवून त्यांची साल काढून किसून घ्या.

- दूध उकळल्यानंतर त्यामध्ये किसलेलं गाजर एकत्र करून मंद आचेवर शिजवून घ्या.

- त्यांनतर त्यामध्ये वेलची पावडर आणि साखर एकत्र करून घ्या.

- आता एका ताटाला तूप लावून घ्या. तयार मिश्रण त्या ताटामध्ये काढून सेट होण्यासाठी ठेवा. 

- एक दुसरा पॅन घ्या आणि त्यामध्ये 1/2 कप दूध मंद आचेवर उकळून घ्या. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर एकत्र करा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.

- त्यानंतर गुलाबपाणी एकत्र करा. 

- गाजराच्या मिश्रणावर दूधाचं मिश्रण पसरवून घ्या. 

- त्यावर कापलेले बदामाचे काप व्यवस्थित लावा. 

- गोड गोड चविष्ट गाजर बर्फी खाण्यासाठी तयार आहे. 


Web Title: Receipe of carrot milk powder burfi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.