कोजागिरी पौर्णिमेला असे बनवा मसाला दूध 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 08:03 AM2018-10-23T08:03:58+5:302018-10-23T08:03:58+5:30

चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसून मसाला दूध पीत काव्य, शास्त्र, विनोदाचा आनंद घेण्याची ही रात्र वर्षभर लक्षात राहते

on occasion of Kojagiri Pournima made this Masala Milk | कोजागिरी पौर्णिमेला असे बनवा मसाला दूध 

कोजागिरी पौर्णिमेला असे बनवा मसाला दूध 

googlenewsNext

आज कोजागिरी पौर्णिमा ! चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसून मसाला दूध पीत काव्य, शास्त्र, विनोदाचा आनंद घेण्याची ही रात्र वर्षभर लक्षात राहते. या दिवशी आटवून तयार केलेल्या मसाला दुधाला पण वेगळाच स्वाद असतो. याच विशेष मसाला दुधाची ही कृती. 

साहित्य :
४ कप दुध
६ टेस्पून साखर
मसाल्यासाठी साहित्य:
१/२ कप बदामाचे पातळ काप 
१ टेस्पून पिस्त्याची भरड 
१/२ टिस्पून वेलचीपूड
१ चिमूटभर केशर'
तीन पारले किंवा मारी बिस्कीट 

कृती:

  • बिस्किटे मिक्सरमध्ये फिरवून त्यांचा चुरा करून घ्या. 
  •  दूध गरम करावे. त्यात दिलेल्या प्रमाणानुसार साखर घालावी. मधुमेह असल्यास शुगर फ्री किंवा तत्सम साखर वापरता येऊ शकते. 
  • त्यात बिस्किटांचा चुरा घालून एकसारखे ढवळावे. गॅस बारीक करून एक उकळी आणावी. 
  • बिस्किटांच्या चुऱ्यामुळे दुधाला घट्टपणा येतो. त्यामुळे जास्त दूध न वापरता आटीव दुधाची चव येते. 
  • यानंतर त्यात केशर आणि वेलचीपूड घालावी.त्यात पिस्ता व बदामाचे काप घालून एक उकळी काढावी. 
  • गरमागरम मसाला दूध तयार.

Web Title: on occasion of Kojagiri Pournima made this Masala Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.