रक्तातील टॉक्सिन्सची पातळी वाढल्याने होतात स्किन प्रॉब्लेम्स; असे करा दूर!    

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 07:16 PM2019-02-18T19:16:15+5:302019-02-18T19:17:33+5:30

सतत बदणारे वातावरण त्वचेसाठी अत्यंत हानिकारक ठरतं, हे अगदी तंतोतंत खरं आहे. परंतु, शरीरामध्ये असणाऱ्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Natural ways to detox your body at home eat these things to get rid of body toxins skin problems | रक्तातील टॉक्सिन्सची पातळी वाढल्याने होतात स्किन प्रॉब्लेम्स; असे करा दूर!    

रक्तातील टॉक्सिन्सची पातळी वाढल्याने होतात स्किन प्रॉब्लेम्स; असे करा दूर!    

सतत बदणारे वातावरण त्वचेसाठी अत्यंत हानिकारक ठरतं, हे अगदी तंतोतंत खरं आहे. परंतु, शरीरामध्ये असणाऱ्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान याच पोषक घटकांच्या कमतरतेमुळे त्वचेला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. या समस्या दूर करण्यासाठी योग्य उपचार केले नाही किंवा याकडे दुर्लक्षं केलं तर, या समस्या वाढण्याचा धोका असतो. एवढचं नाही तर या समस्यांचं त्वचेच्या आजारांमध्ये रूपांतर होण्याती शक्यता असते.  

शरीरामध्ये टॉक्सिन्सची मात्रा वाढल्याने त्वचेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. लिव्हरमध्ये टॉक्सिन्स होणं ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे रक्तामध्ये अशुद्ध घटकांचा समावेश होतो. हे रक्त जेव्हा संपूर्ण शरीरामध्ये पसरतं, त्यावेळी वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांवरील त्वचेला इन्फेक्शन होतं. पूरळ, पिम्पल्स, लाल किंवा पाढरे डाग यांसारख्या स्किन प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागतो. 

स्किन प्रॉब्लेम्सपासून सुटका करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे तुमच्या डाएटमध्ये थोडेसे चेंज करणं. प्रयत्न केले तर प्रत्येक समस्येवर वेगवेगळे उपाय आहेत. लिव्हरमध्ये टॉक्सिन असल्यामुळे थोड्या थोड्या वेळाने नवनवीन स्किन प्रॉब्लेम्सचा सामान करावा लागतो. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी डाएटमध्ये पौष्टिक घटकांचा समावेश करावा. 

लिव्हरमध्ये जमा झालेले टॉक्सिन्स नष्ट करण्यासाठी हे 5 पदार्थ ठरतील फायदेशीर :

1. सलाड

दिवसातून तीन वेळा जेवणाव्यतिरिक्त जेव्हाही भूक लागेल तेव्हा सलाडचा आहारामध्ये समावेश करा. जेवणाअगोदर साधरणतः एक तास अगोदर सलाड खा. शक्यतो तळलेले पदार्थ खाणं टाळा. सलाड खाल्याने मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळण्यास मदत होते. दररोज सलाड खाल्याने शरीराचं आरोग्य उत्तम राहण्यासही मदत होते. 

2. पाणी प्या

पाणी अनेक त्वचेच्या समस्यांवर रामबाण इलाज आहे. केवळ योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. पाणी शरीराला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. पाणी शरीरामध्ये फॅट्स जमा होऊ देत नाही. त्यामुळे आपल्या रूटीनमध्ये पाण्याचा जास्तीत जास्त समावेश करा. 

3. लिंबू आणि संत्री

लिंबू आणि संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन-सी असतं. याव्यतिरिक्त अॅन्टी-ऑक्सिडंटही मोठ्या प्रमाणावर असतात. ही दोन्ही तत्व शरीरातील विषारी घटक स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. जर दररोज लिक्विड स्वरूपात यांचं सेवन केलं तर शरीराला अधिक फायदा होतो. 

4. फळं

अननस, सफरचंद, जांभूळ, डाळिंब इत्यादी फळांचं सेवन जास्तीत जास्त करा. यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट तत्व आढळून येतात. याचं सेवन केल्याने शरीरामध्ये असलेले टॉक्सिन्स नष्ट होण्यास मदत होते. शरीर आतून स्वच्छ होतं आणि त्वचेच्या मृत पेशी रिपेअर होण्यासही मदत होते. एवढचं नाही तर फळं शरीर प्यूरिफाय करण्याचं काम करतात.

Web Title: Natural ways to detox your body at home eat these things to get rid of body toxins skin problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.