बहुगुणी नारळाची शेंडी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:04 AM2018-04-30T03:04:37+5:302018-04-30T03:04:37+5:30

नारळ... शास्त्रीय नाव आहे कोकोस नुसिफेरा आणि इंग्रजीमध्ये कोकोनट. हा ताड कुळातील वृक्ष आहे. सुमारे ३० मीटर उंचीच्या या झाडाला चार ते सहा मीटर लांबीच्या झावळ्या फुटतात.

Multicolored coconut shell | बहुगुणी नारळाची शेंडी..

बहुगुणी नारळाची शेंडी..

googlenewsNext

अर्चना देशपांडे-जोशी
नारळ... शास्त्रीय नाव आहे कोकोस नुसिफेरा आणि इंग्रजीमध्ये कोकोनट. हा ताड कुळातील वृक्ष आहे. सुमारे ३० मीटर उंचीच्या या झाडाला चार ते सहा मीटर लांबीच्या झावळ्या फुटतात. दरमहिन्याला फुलांचा एक तुरा येतो. तुऱ्यातील मादी फुलांना लागलेली फळे ११ ते १२ महिन्यांत पिकतात. म्हणजेच, प्रत्येक महिन्याला प्रत्येक झाडावरून एक घड मिळतो. नारळ हे फळ पवित्र मानले जाते. धार्मिक कार्यात याला श्रीफळ असे म्हणतात. याचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. याच नारळाच्या शेंडीपासून कलाकृती तयार करू या...

आई नारळ खवण्याला विळीवर बसली की, आम्ही तिच्या बाजूला बसून विळीच्या पात्याच्या खवणीवर असलेली नारळाची चव खाण्यासाठी धडपडत होतो. आता विळी पण नाही नि खवणी पण नाही. करंजीसाठी सुके आणि मोदकांसाठी ओले सारण तयार करत असताना मध्येच हात मारून बकाणा भरताना धपाटे पण खाल्ले आहेत. गावाला नारळाच्या झाडाखाली सकाळीच हजेरी असायची आम्हा बच्चेकंपनीची आणि आमचा हिरा गडी काय सरसर झाडावर चढायचा आणि वरूनच शहाळ्याची ही भलीमोठी पेंढी उतरवायचा. मग काय, हिरा शहाळे सोलतोय आणि आम्ही लायनीत उभे राहून एक काय पाच किंवा सहा शहाळीपण चापत असू. आधी शहाळ्याचे अमृत पिण्याचा कार्यक्रम. नंतर, खोबºयाची मेजवानीच भरत असे.
संध्याकाळी करवंटीवर करवंटी रचून लगोरी आणि पहाटे याच करवंट्या बंबाखाली पेटवून पाणी गरम करण्याची मजा काही औरच होती. पाणी गरम होईपर्यंत नारळाची शेंडी दुसºयाच्या डोक्यावर नकळत टाकून ए शेंडी शेंडी म्हणत चिडवत मस्ती करायची. हीच शेंडी आई भांडी घासायला पण वापरायची. काहीही फुकट जायचे नाही. दुपारी नारळाच्या झावळ्या सोलून हिरा गडी हिºयाच्या काड्या काढून झक्कास झाडू बनवत असे आणि मुंबईला येताना दोनतीन तरी झाडू सामानात सामील होत.
सौंदर्यप्रसाधनांमध्ये नारळाचे तेल वापरले जाते; कारण त्वचेसाठी ते पोषक आहे. लिपस्टिक आणि उन्हापासून संरक्षण देणाºया लोशन्समध्येही नारळाचा वापर करतात. भरपूर फेस निर्माण करणाºया साबणाचा किंवा शाम्पूचा तुम्ही वापर करत असाल, तर नारळाचे तेल हे त्यातील मुख्य घटक असते. पावसाळ्यात चेहरा आॅइली होणे ही समस्या असेल, तर त्यावर उपाय म्हणजे नारळाचे पाणी. ते आपण चेहºयाला लावून ठेवले तर त्यामुळे त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यासाठी मदत होते. ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही आॅरगॅनिक तत्त्व असतात, त्यामुळे त्वचेला त्याचा फायदा होतो. निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार मसाज केला, तर त्वचेला ग्लो येतो. गर्भधारणेनंतर आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. शिवाय, टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे.
इंडोनेशियन लोक असे म्हणतात की, ‘वर्षाचे जेवढे दिवस आहेत, तेवढे नारळाच्या झाडाचे व नारळाचे उपयोग आहेत.’ फिलिपाइन्समध्ये नारळाचे रोप लावणाºया व्यक्तीला भांडी, कपडालत्ता, अन्नपाणी, घर आणि मुलांकरिता वारसा हक्क दिला जातो. नारळाच्या झाडापासून केवळ अन्नपदार्थ, पाणी आणि स्वयंपाकासाठी तेलच मिळत नाही, तर त्याच्या पानांचा छतासाठी उपयोग केला जाऊ शकतो, चोड्यांपासून सुतळ्या आणि चटया बनतात. करवंटीपासून भांडी आणि अलंकार बनवतात. याच्या फुलोºयातून काढलेल्या गोड रसापासून साखर आणि मद्य तयार केले जाते. योग्य तºहेने कापलेल्या खोडाचादेखील उपयोग करतात. हिंदी महासागरातील मालदीव बेटावरील रहिवाशांनी नारळाच्या उत्पादनातून बोटी बांधल्या आणि असे म्हटले जाते की, या बोटींतून त्यांनी अरेबिया आणि फिलिपाइन्सपर्यंत प्रवास केला. नारळाच्या उत्पादकांपेक्षा नारळानेच सर्वाधिक समुद्रप्रवास केला आहे. नारळाने कोणाच्याही मदतीविना पृथ्वीवरील सर्वात दूरच्या ठिकाणी प्रवास केला आहे.
नारळ पिकल्यावर खाली पडतो आणि किनारपट्टीवरून गडगडत पाण्यात जातो. भरतीच्या वेळी तो समुद्रात जातो. नारळाच्या तंतुमय बाह्य कवचात बरीच हवा अडवली जाते, त्यामुळे तो पाण्यावर तरंगू शकतो.
खाºया पाण्यात सहसा बहुतेक इतर बिया नष्ट होतात, पण नारळाच्या जाडसर बाह्य कवचामुळे पाणी आत शिरायला वेळ लागतो. समुद्रामध्ये नारळ तीन महिन्यांपर्यंत सहज टिकू शकतो आणि काही वेळा तो हजारो किलोमीटर दूरवर वाहत जातो. योग्य किनारपट्टीवर पोहोचला की, त्याचे तिथे रोप तयार होते. कदाचित, अशाच प्रकारे जगातील उष्णकटिबंधातील किनारपट्टींवर नारळाचा प्रसार झाला असावा. नारळ म्हटले की, केवळ मिठाईमध्ये किंवा कुकीजमध्ये घातलेला नारळ आठवतो; पण आग्नेय आशियात नारळ हा बहुउपयोगी आहे.
एक गोष्ट मात्र नक्की की, नारळाच्या बहुउपयोगी गुणांमुळे त्याचे पीक किफायतशीर तर आहेच, शिवाय पुष्कळांसाठी ते महत्त्वाचे अन्नदेखील आहे. त्यामुळे, तुम्हाला नारळाचे झाड दिसले, तर ते केवळ किनारपट्टींची शोभा वाढवणारे झाड नाही. पृथ्वीतलावरील उपयोगी ‘कवच-फळ’ देणाºया झाडांपैकी ते एक आहे. याच्या संकरित जाती टीडी (केरासंकरा) आणि टीडी (चंद्रसंकरा) या असून वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली), लक्षद्वीप आॅर्डिनरी, प्रताप, फिलिपाइन्स आॅर्डिनरी या जातीपण आहेत. याच्या ठेंगू जातींना त्याच्या रंगावरून आॅरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ असे ओळखले जाते. यातील आॅरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम असून तिच्या १०० मिली पाण्यात सात ग्रॅम एवढे साखरेचे प्रमाण असते.
असा हा नारळ. आपण आज वापरणार आहोत, त्याची शेंडी. काहीजण तिला शेंबी असेपण म्हणतात. मलईशिवाय शहाळे आणि शेंडीशिवाय नारळ शोभून नाही दिसत, खरे ना!

कलाकृती : श्रीफळ शुभेच्छा
साहित्य : श्रीफळाची साल, सुपारीचे टरफल, गम, सुतळ, शिंपला, हीर, सुकलेली पाने, मार्कर.

सुकलेली मोठी पाने, मागे हीर व श्रीफळाची साल एकत्र चिकटवा.
पुढील बाजूस सुपारीचे टरफल खोलगट भाग दर्शनी ठेवून मधोमध चिकटवा.
सुतळ लपेटून बो बांधा.
सुपारीच्या टरफलाच्या आत मार्करने चेहºयाचे चित्र काढा.
शिंपला चिकटवून सुशोभन करा.
किमान वाळू द्या.

 

apac64kala@gmail.com 

Web Title: Multicolored coconut shell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.