चहा पिण्याची 'ही' पद्धत ठरते जीवघेणी, जाणून घ्या कशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 11:01 AM2019-04-22T11:01:03+5:302019-04-22T11:06:18+5:30

चहाबाबत सतत काहीना काही चर्चा होत असते. पण खरं तर हे आहे की, भारतासारख्या देशात चहा जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग झाला आहे.

This method of drinking tea is fatal | चहा पिण्याची 'ही' पद्धत ठरते जीवघेणी, जाणून घ्या कशी!

चहा पिण्याची 'ही' पद्धत ठरते जीवघेणी, जाणून घ्या कशी!

(Image Credit : medium.com)

चहाबाबत सतत काहीना काही चर्चा होत असते. पण खरं तर हे आहे की, भारतासारख्या देशात चहा जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग झाला आहे. दिवसाची सुरुवात चहानेच होते. तर काही लोकांचा ब्रेक चहासाठी होतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत चहा सर्वांच्या पसंतीचा झाला आहे. पण जसजसा चहाच्या चवीमध्ये बदल बघायला मिळतो तसतशी चहा पिण्याची पद्धतही बदलली आहे. सध्या चहा पिण्याची एक नवी पद्धत इतकी वाढली आहे की, याने तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. 

(Image Credit : www.drweil.com)

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, डिस्पोजल किंवा प्लास्टिकच्या ग्लासमध्ये अलिकडे चहा पिणे सामान्य बाब झाली आहे. चहाच्या प्रत्येक दुकानात डिस्पोजल मिळतात. अनेकदा इच्छा नसूनही डिस्पोजलमध्ये चहा प्यावा लागतो. मात्र डिस्पोजलमध्ये चहा पिणं इतकं घातक आहे की, याने कॅन्सर होऊ शकतो. रोज-रोज डिस्पोजलचा वापर आरोग्याला हानिकारक ठरु शकतं. हे डिस्पोजल पॉली-स्टीरीनपासून तयार केलेले असतात. जेव्हा आपण या डिस्पोजलमध्ये गरम चहा ओततो तेव्हा याचे काही केमिकल्स गरम चहामध्ये मिसळले जातात आणि ते चहासोबत पोटात जातात. या पॉली-स्टीरीनमुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

मग ज्या चहामुळे तुम्हाला फ्रेश वाटतं त्याच चहामुळे नंतर थकवा, एकाग्रतेमध्ये कमतरला, हार्मोन्समध्ये असंतुलन इत्यादी समस्या जाणवू लागतात. त्यासोबतच अनेकप्रकारच्या समस्या या डिस्पोजलच्या वापरामुळे होतात. डिस्पोजलमध्ये असलेल्या केमिकल्सने मेंदूच्या प्रकियेवरही प्रभाव पडतो. त्यासोबतच व्यक्तीची समजण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीही कमी होऊ लागते. डॉक्टर्स सांगतात की, प्लास्टिकच्या कपात नेहमी गरम चहाचं सेवन केल्याने किडनी आणि लिव्हरचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. 

(Image Credit : PickPik)

डिस्पोजलमधून चहा बाहेर येऊ नये म्हणूण त्यावर वॅक्सची परत चढवली जाते. जेवढ्या वेळेस तुम्ही यातून चहा किंवा पाणी पिता तेवढ्या वेळेस वॅक्स तुमच्या पोटात जाते. या कारणामुळे तुमच्या आतड्यांचं नुकसान होऊ शकतं. डिस्पोजलमध्ये गरम चहा प्यायल्याने यात आढळणारं अ‍ॅसिडही पोटात जातं. हे अ‍ॅसिड पोटात जमा होतं आणि त्याने पचनक्रिया प्रभावित होते.  

गर्भवती महिला आणि लहान मुलांवर या डिस्पोजल ग्लासचं अधिक नकारात्मक प्रभाव होतो. यात असलेल्या मेट्रोसेमिन, बिस्फीनॉल आणि बर्ड इथाइल डेक्सिन नावाच्या केमिकल्समुळे शरीराचं मोठं नुकसान होतं. 

Web Title: This method of drinking tea is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.