सर्वांना हवीहवीशी वाटणारी सोलकढी कशी तयार करतात माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 05:45 PM2019-04-27T17:45:31+5:302019-04-27T17:46:50+5:30

घरात मासे, चिकन किंवा मटणाचा बेत असेल तर हमखास सोल कढी करण्यात येते. सोलकढी म्हणजे, ताकासाठी असलेला पर्याय असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही.

Marathi recipe how to make solkadhi or kokum kadhi | सर्वांना हवीहवीशी वाटणारी सोलकढी कशी तयार करतात माहीत आहे का?

सर्वांना हवीहवीशी वाटणारी सोलकढी कशी तयार करतात माहीत आहे का?

googlenewsNext

घरात मासे, चिकन किंवा मटणाचा बेत असेल तर हमखास सोल कढी करण्यात येते. सोलकढी म्हणजे, ताकासाठी असलेला पर्याय असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. यासाठी कोकम आणि नारळाचं (खोबऱ्याचं) दूध या पदार्थांची गरज असते. खरं तर सोलकढी तुम्ही नुसतीच पिऊ शकता किंवा भातावरही खाऊ शकता. 

उन्हाळ्यातही सोलकढी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये वापरण्यात येणारं कोकम आणि नारळाच्या दूधामध्ये निसर्गतः थंड गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सोलकढी उत्तम ठरते. सोलकढी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि तयार करण्याची कृती...

साहित्य :

  • ताज्या नारळाचं दूध 
  • कोकम
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर बारीक चिरून
  • लसूण पाकळ्या
  • टीस्पून साखर
  • मीठ चवीनुसार 

 

कृती :

- एक कप ताज्या खोबऱ्याचे तुकडे आणि एक कप पाणी मिक्सर किंवा ब्लेंडरमध्य घालून त्याची प्युरी तयार करा. सुती कपड्याने तयार प्युरी गाळून घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दूध तयार करा. त्यातून उरलेला चोथा टाकून द्या. 

- तुम्ही रेडिमेड कोकनट मिल्कचाही वापर करू शकता. 

- पाण्यामध्ये कोकम भिजत ठेवा. त्यामुळे कोकमाचा अर्क पाण्यात उरतेल. 

- अर्ध्या तासाने कोकमाचं पाणी नारळाच्या दूधामध्ये घालून कोकम बाजूला काढून ठेवा. 

- थोडीशी साखर आणि मीठ एकत्र करून मिश्रण ढवळून घ्या. 

- लसण्याच्या पाकळ्या ठेचून घाला. तुम्हाला लसूण नको असेल तर नाही घातला तरिही चालेल. 

- हिरव्या मिरचीचे तुकडे करून मिश्रणामध्ये एकत्र करा. 

- वरून बारिक चिरलेली कोथिंबीर एकत्र करा. सोलकढी तयार आहे.

- थंड करण्यासाठी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. 

Web Title: Marathi recipe how to make solkadhi or kokum kadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.