थंडीमध्ये पौष्टिक ठरतो सफरचंदाचा हलवा; जाणून घ्या रेसिपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 08:18 PM2019-01-11T20:18:24+5:302019-01-11T20:22:46+5:30

सफरचंद आरोग्यासाठी पौष्टिक ठरतं हे तर आपल्याला माहीत आहेच. पण तुम्हाला सफरचंदापासून तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांबाबत माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सफरचंदापासून तयार होणारी एक हटके रेसिपी.

Make delicious apples desert halwa in the winter | थंडीमध्ये पौष्टिक ठरतो सफरचंदाचा हलवा; जाणून घ्या रेसिपी!

थंडीमध्ये पौष्टिक ठरतो सफरचंदाचा हलवा; जाणून घ्या रेसिपी!

Next

सफरचंद आरोग्यासाठी पौष्टिक ठरतं हे तर आपल्याला माहीत आहेच. पण तुम्हाला सफरचंदापासून तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांबाबत माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सफरचंदापासून तयार होणारी एक हटके रेसिपी. जी फक्त चविष्ट नाही तर हेल्दीही आहे. जाणून घेऊया सफरचंदाचा हलवा तयार करण्याच्या रेसिपीबाबत...

थंडीमध्ये अत्यंत फायदेशीर ठरतो हा हलवा

थंडीमध्ये अनेक वेगवेगळ्या हलव्याच्या रेसिपी तयार केल्या जातात. मग तो गाजराचा हलवा असो किंवा मुगाच्या डाळीचा. अनेक हलव्याच्या रेसिपी तयार करण्यात येतात. पण तुम्ही कधी सफरचंदाचा हलवा खाल्ला आहे का? हा हलवा चवीला तर उत्तम असतोच पण आरोग्यासाठीही उपयोगी ठरतो. तुम्ही घरच्या घरी अगदी सहज हा हलवा तयार करू शकता. 

साहित्य :

  • एक सफरचंद 
  • ¼ खवा
  • ¼ साखर
  • ¼  तूप
  • ½ चमचा वेलची पावडर
  • ड्रायफ्रुट्स

 

सफरचंदाचा हलवा तयार करण्याची कृती :

- सफरचंदाची साल काढून मिक्सरमधून बारिक करून घ्या.

- मंद आचेवर एका पॅनमध्ये तूप घालून गरम करून घ्या.

- आता तूपामध्ये काजू आणि बदाम 30 सेकंद फ्राय करून घ्या.

- आता सफरचंद पॅनमध्ये टाकून मंद आचेवर शिजवून घ्या.

- 10 मिनिटांपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या. 

- आता त्यामध्ये साखर आणि खवा एकत्र करून व्यवस्थित एकत्र करा. 

- मिश्रण एकत्र करून व्यवस्थित शिजवल्यानंतर काजू, बदाम आणि वेलची पावडर एकत्र करून घ्या.

- चविष्ट आणि पौष्टिक सफरचंदाचा हलवा तयार आहे. 

Web Title: Make delicious apples desert halwa in the winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.