टेस्टी अ‍ॅन्ड हेल्दी गाजर आणि आल्याचं सूप!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 02:43 PM2019-02-11T14:43:20+5:302019-02-11T14:45:20+5:30

हिवाळ्यात बाजारात गाजरांची चांगलीच आवक वाढते आणि लोकही गाजरांचे वेगवेगळे पदार्थ बनवून चवीने खातात. याचे अनेक फायदेही आहेत. तसेच आलंही आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतं.

How to make carrot ginger soup recipe | टेस्टी अ‍ॅन्ड हेल्दी गाजर आणि आल्याचं सूप!

टेस्टी अ‍ॅन्ड हेल्दी गाजर आणि आल्याचं सूप!

googlenewsNext

हिवाळ्यात बाजारात गाजरांची चांगलीच आवक वाढते आणि लोकही गाजरांचे वेगवेगळे पदार्थ बनवून चवीने खातात. याचे अनेक फायदेही आहेत. तसेच आलंही आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतं. अशातच थंडीमध्ये आरोग्याला उष्णता देणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. अशाच या थंडीच्या दिवसात जर गरमागरम सूप मिळालं तर बात काही औरचं... तुम्हालाही गरमगरम सूप पिण्याची इच्छा असेल तर गाजर आणि आल्याचं सूप नक्की ट्राय करा. 

गाजर आणि आल्याचं हे सूप चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही लाभदायक ठरतं. हे सूप तयार करण्यासाठी गाजर, ओवा आणि आल्याचा वापर करण्यात येतो. तसेच यामध्ये हलके मसाले वापरण्यात येतात. पाहूयात हेल्दी आणि टेस्टी गाजर, आल्याचं सूप तयार करण्याची रेसिपी...

साहित्य :

  • 400 ग्रॅम गाजर
  • आल्याचे छोटे तुकडे
  • 2 छोटे चमचे तेल
  • 1 छोटा चमचा जीरं
  • 1 छोटा चमचा ओवा
  • चिमुटभर हींग
  • मीठ चवीनुसार
  • 2 छोटे चमचे साखर
  • दोन छोटे चमचे लिंबाचा रस 
  • काळी मिरी वापडर

कृती :

- गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरं, ओवा आणि हिंग टाकून परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये काळी मिरी पावजर. कापलेले गाजराचे तुकडे आणि आलं टाकून 10 मिनिटं शिजवून घ्या. 

- शिजलेलं मिश्रण साधारण अर्धा लीटर पाण्यामध्ये बारिक करून एक पेस्ट तयार करा. 

- पुन्हा एकदा कढई गरम करून तयार पेस्ट मध्यम आचेवर शिजवून घ्या. आता यामध्ये मीठ आणि साखर टाकून 10 मिनिटांसाठी शिजवून घ्या. त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस टाकून गॅस बंद करा. 

- गाजर आणि आल्याचं सूप तयार आहे. 

- गरमा गरम गाजर आणि आल्याचं सूप सर्व्ह करू शकता. 

Web Title: How to make carrot ginger soup recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.