ड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 04:06 PM2018-08-19T16:06:04+5:302018-08-19T16:33:23+5:30

ड्रॅगन फ्रुट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो.

health benefits of dragon fruits | ड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

ड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

googlenewsNext

ड्रॅगन फ्रुट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो. सामान्यतः ड्रॅगन फ्रुट थायलंड, व्हिएतनाम, इस्त्राईल आणि श्रीलंकेमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर  ठरतं. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते. जाणून घेऊयात ड्रगन फ्रुटचे शरीराला होणारे फायदे...

सांधेदुखीवर लाभदायक

ड्रॅगन फ्रुटमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असतं. जे शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी उपयोगी असतं. त्यामुळे सांधेदुखीवर ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतं. तसेच यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होण्यासाठी मदत होते. 

केसांसाठी फायदेशीर

ड्रॅगन फ्रुट केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही फायदेशीर असतं. बऱ्याचदा अनेक लोकं केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी केसांना कलर करतात. परंतु कलरमधील केमिकल्समुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यांपासून केसांचा बचाव करण्यासाठी ड्रॅगन फ्रुटमधील पोषक तत्व मदत करतात.  

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी 

ड्रॅगन फ्रुट हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते. याच्या सेवनाने धमन्या आणि नसांमध्ये प्लाक जमा झाल्याने  हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याचा धोका संभवतो. पम ड्रॅगन फ्रुटमधील पोषक तत्वांमुळे या शक्यता कमी होतात. 

त्वचेसाठी फायदेशीर 

ड्रॅगन फ्रुट त्वचेच्या समस्यांवरही फायदेशीर असतं. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंटचं प्रमाण अधिक असतं. तसेच व्हिटॅमिन सी त्वचेसाठी चांगलं असतं. त्यामुळे त्वचा मुलायमही होते. 

Web Title: health benefits of dragon fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.