Gudi Padwa 2018: 'असा' बनवा श्रीखंडाचा चीज केक! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 05:28 PM2018-03-17T17:28:36+5:302018-03-17T17:29:27+5:30

पारंपरिक रेसिपीला मॉर्डन लूक देऊन सर्व वर्गाला आकर्षित करण्यासाठी हा विशेष केक तयार करण्यात आला आहे.

Gudi Padwa 2018: Shreeakhand cheeses cake recipe | Gudi Padwa 2018: 'असा' बनवा श्रीखंडाचा चीज केक! 

Gudi Padwa 2018: 'असा' बनवा श्रीखंडाचा चीज केक! 

Next

- मास्टरशेफ अजय चोप्रा

गुढीपाडवा म्हटलं की चिभेवर रेंगाळू लागते ती श्रीखंडाची चव. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त मास्टरशेफ अजय चोप्रा यांनी खास श्रीखंड चीज केक तयार केला आहे. पारंपरिक रेसिपीला मॉर्डन लूक देऊन सर्व वर्गाला आकर्षित करण्यासाठी हा विशेष केक तयार करण्यात आला आहे. श्रीखंड आणि चीज याचे मिश्रण असलेला हा केक खवय्यांच्या पसंतीस उतरेल.

श्रीखंड चीज केक

बेससाठी
साखर १०० ग्रॅम
कुरमुरे ७० ग्रॅम 

चीज केक साठी
३०० ग्राम सॉफ्ट क्रीम चीज मूळ फिलाडेल्फिया
३०० ग्राम व्हिट क्रीम
दीड कप दाणेदार साखर
१/३कप लिंबाचा रस
१ टेस्पून कॉर्नफ्लॉवर
१ ½ टिस्पून वेनिला अर्क
१ ½ टीस्पून लिंबू असोशी
¼ - दीड टिस्पून केशर, वरीलप्रमाणे निर्देशित केले

श्रीखंडासाठी
दही १ किलो
साखर ५०० ग्रॅम
वेलची पूड २५ ग्रॅम
केशर १० स्प्रिॅग 

कृती
मलाईमध्ये क्रिम चिज टाकून मिश्रण एकजीव करा. श्रीखंडासाठी लागणारं साहित्य एकत्र करून मिश्रण नीट एकत्र करा. नंतर श्रीखंड व तयार चिज एकत्र करा. त्यामध्ये साखरेचा पाक, कुरमुरे एकत्र करून मिश्रण तयार करा. बेस सेट झाल्यानंतर एकत्र करा.

Web Title: Gudi Padwa 2018: Shreeakhand cheeses cake recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.