आरोग्यासाठी डिंक ठरतो पौष्टीक; असे तयार करा डिंकाचे लाडू!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 04:48 PM2018-11-15T16:48:08+5:302018-11-15T19:19:51+5:30

डिंक म्हणजे पोषक तत्वांनी भरपूर असा एक पदार्थ होय. भारतामध्ये अगदी सर्रास हा पदार्थ प्रत्येक घरांमध्ये आढळून येतो. आयुर्वेदामध्येही याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.

gond health benefits know how to make nutritious gond or dinkache che laddoo | आरोग्यासाठी डिंक ठरतो पौष्टीक; असे तयार करा डिंकाचे लाडू!

आरोग्यासाठी डिंक ठरतो पौष्टीक; असे तयार करा डिंकाचे लाडू!

googlenewsNext

डिंक म्हणजे पोषक तत्वांनी भरपूर असा एक पदार्थ होय. भारतामध्ये अगदी सर्रास हा पदार्थ प्रत्येक घरांमध्ये आढळून येतो. आयुर्वेदामध्येही याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. डिंकाचे सेवन केल्याने शरीरातील थकवा नाहीसा होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक असणारी पोषक तत्व डिंकामध्ये असतात. आजारी व्यक्तींना किंवा अशक्तपणा आलेल्या व्यक्तींसाठीही डिंक फायदेशीर ठरतो. डिंक औषधी असून वेगवेगळ्या झाडांपासून मिळवता येतो. 

डिंक मध्य पूर्व, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमधील काही भागांमध्ये आढळतो. डिंकाचा उपयोग फार पूर्वीपासून पोटातील जंत, खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी वापरण्यात येतो. डिंकाचा वापर औषधासोबतच बेकरी प्रोडक्ट्स, सौंदर्य उत्पादनं, एनर्जी ड्रिंक आणि आइसक्रिम्स इत्यादींमध्ये प्रयोग करण्यात येतो. 

डिंक गरम असल्यामुळे विशेषत: थंडीमध्ये याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. अनेकदा घराघरांमध्ये डिंकाचे लाडू तयार करण्यात येतात. डिंकात असलेल्या गरम गुणधर्मांमुळेच हे मुख्यतः हिवाळ्यात तयार केले जातात. त्याचप्रमाणे डिंक खाल्यामुळे शरीरिला कॅलरी मिळतात. 

डिंक खाण्याचे फायदे : 

डिंकाचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आयुर्वेदातही डिंकाबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी डिंकाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. भारतामध्ये डिंक मुख्यतः बाभळीच्या झाडापासून मिळवलं जातं. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्या दूर होतात. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी कमी असणाऱ्या लोकांनी डिंकाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. हे त्वचेची काळजी घेण्यासाठी ओळखलं जातं. डिंक रात्रभर पाण्यामध्ये ठेवून त्याची पौष्टीक पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यामध्ये बदामाची पावडर आणि दूधही तुम्ही मिक्स करू शकता. दररोज सेवन केल्याने आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. 

असे तयार करा डिंकाचे पौष्टीक लाडू :

साहित्य :

  • किसलेले सुके खोबरे 1 1/2  वाट्या
  • खारीक पावडर  1 वाटी
  • खाण्याचा डिंक  1/2 वाटी
  • खसखस 2 टीस्पून
  • वेलची पूड 2 टीस्पून
  • जायफळ पावडर  1 टीस्पून
  • सुका मेवा 1/2 वाटी (बदाम,काजू,पिस्ते,मनुका,बेदाणे)
  • गूळ  2 वाट्या
  • साजूक तूप 1 वाटी
  • डेसिकेटेड कोकोनट 2 चमचे

 

कृती :

- सर्वात आधी कोरड्या कढईमध्ये खसखस भाजून घ्या. त्यानंतर खोबर्‍याचा कीस भाजून घ्या. दोन्ही कोरड्या वस्तू भाजून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घ्या. 

- कढईमध्ये तूप घ्या. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये डिंक तळून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ते तळून घ्यावे. त्यानंतर खारकेची पूडही तूपात भाजून घ्यावी. 

- भाजलेली खसखस थोडी कूटून घ्यावी. त्यानंतर खोबरं आणि डिंक हाताने थोडं चुरून घ्यावे. 

- सर्व भाजलेले साहित्य, सुकामेवा, जायफळ आणि वेलची पूड एकत्र करावे. 

- दुसऱ्या एका भांड्यामध्ये गूळ घेऊन त्यामध्ये दोन चमचे पाणी मिक्स करावे. हे मिश्रण गॅसवर ठेवून सतत ढवळत राहा. गूळ वितळून वर आल्यानंतर गॅस बंद करा. 

- तयार पाकामध्ये कोरडं मिश्रण घालून व्यवस्थित एकत्र करावे. मिश्रण गरम असेपर्यंत त्याचे लाडू वळून घ्यावे. 

- प्रत्येक लाडू वळल्यानंतर खोबऱ्याच्या किसामध्ये घोळावे आणि कडेला ठेवावे. 

- हे लाडू खूप पौष्टीक असतात. साधरणतः हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी हे फायदेशीर ठरतात. 

Web Title: gond health benefits know how to make nutritious gond or dinkache che laddoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.