थंडीमध्ये सलाड खाणं ठरतं फायदेशीर; 'या' भाज्यांचा आवर्जुन करा समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 07:12 PM2018-11-15T19:12:15+5:302018-11-15T19:13:04+5:30

खरं त सलाड हे नाव ऐकलं तर एखादा विदेशी पदार्थ डोळ्यांसमोर येतो. पण खरं पाहता हा पदार्थ फार पूर्वीपासूनच आपण खात आलो आहोत. आपल्या ताटात आवर्जुन वाढली जाणारी कोशिंबीर म्हणजेच सलाड.

diet healthy indian winter vegetables | थंडीमध्ये सलाड खाणं ठरतं फायदेशीर; 'या' भाज्यांचा आवर्जुन करा समावेश!

थंडीमध्ये सलाड खाणं ठरतं फायदेशीर; 'या' भाज्यांचा आवर्जुन करा समावेश!

Next

खरं त सलाड हे नाव ऐकलं तर एखादा विदेशी पदार्थ डोळ्यांसमोर येतो. पण खरं पाहता हा पदार्थ फार पूर्वीपासूनच आपण खात आलो आहोत. आपल्या ताटात आवर्जुन वाढली जाणारी कोशिंबीर म्हणजेच सलाड. जेवणासोबत सलाड असलं तर जेवणाच्या आनंदात आणखी भर पडते. काकडी, गाजर, बीट, टॉमेटो आणि कांदा एकत्र करून सलाड तयार करण्यात येतं. अनेकदा यामध्ये दह्याचाही समावेश करण्यात येतो. तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर सलाड हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. 

तुम्ही सलाड कधीही खाऊ शकता. मग जेवताना किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर. भारतामध्ये हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ तयार करण्यात येतात. त्यामध्ये काही पारंपारिक पदार्थांसोबत भाज्यांचाही समावेश असतो. अशातच तुम्ही शरीरासाठी फायदेशीर असणाऱ्या भाज्यांचा सलाडमध्ये समावेश करू शकता.

लाल मूळा :

लाल मूळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी आणि बी 6 आढळून येतं. याशिवाय मॅग्नेशिअम, कॉपर कॅल्शिअम आणि आयर्नदेखील मुबलक प्रमाणात असतं. पांढऱ्या मुळ्याप्रमाणेच लाल मूळाही शरीरासाठी फायदेशीर ठरतो. अगदी सहज हा मूळा बाजारामध्ये उपलब्ध होतो. या मूळ्याचा सलाडमध्ये समावेश केल्याने सलाडच्या चवीसोबतच त्याची पौष्टिकताही वाढते. 

लेटस :

लेटस चवीला फार सुंदर लागतं. साधारणतः बर्गरमध्ये याचा वापर केला जातो. सलाडमध्ये याचा समावेश केल्याने सलाडमध्ये एक क्रंचीनेस येतो. लेटस भारतीय भाजी नसली तरीदेखील देशभरामध्ये या भाजीला फार मागणी आहे त्यामुळे तिचं उत्पादन स्थानिक ठिकाणी करण्यात येते. 

गाजर :

गाजरामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणावर असतं. हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी ही भाजी पौष्टीक समजली जाते. डायटरी फाइबर, विटामिन सी, बीटा-कॅरोटिन यांच्यासह अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. 

बेरीज :

भारतीय सुपर फूड्समध्ये समाविष्ठ करण्यात येणाऱ्या बेरीजमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. आवळ्यापासून स्ट्रॉबेरीपर्यंत सर्व बेरीज थंडीमध्ये खाण्यासाठी फायदेशीर ठरतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बेरीज उपयोगी ठरतात. 

Web Title: diet healthy indian winter vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.