खजूर खूप गुणकारी : खाऊन येईल शक्ती भारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 04:21 PM2019-05-17T16:21:07+5:302019-05-17T16:24:06+5:30

रमजानचा महिना सुरु असल्यामुळे सध्या बाजारात उत्तम प्रतीचे खजूर विक्रीला आले आहेत. अतिशय पौष्टिक असलेले हे खजूर शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यामुळे लहान मुलांसह मोठ्या माणसांनी आणि गर्भवती महिलांनी खजूराचे सेवन करायला हवे. 

Dates are very useful fruit and gives instant energy | खजूर खूप गुणकारी : खाऊन येईल शक्ती भारी !

खजूर खूप गुणकारी : खाऊन येईल शक्ती भारी !

googlenewsNext

पुणे :रमजानचा महिना सुरु असल्यामुळे सध्या बाजारात उत्तम प्रतीचे खजूर विक्रीला आले आहेत. अतिशय पौष्टिक असलेले हे खजूर शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यामुळे लहान मुलांसह मोठ्या माणसांनी आणि गर्भवती महिलांनी खजूराचे सेवन करायला हवे. 

 

  •  बद्धकोष्ठतेचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना खजूर फायदेशीर आहे. खजूर रात्रभर पाण्यात भिजून ठेऊन ते सकाळी खाल्याने चांगला लाभ होतो.खजूरामध्ये सॉयुबल फाइबर असतात त्यामुळे पोट साफ होते. 

 

  • वजन वाढवायचे असतील तर खजूर उपयोगी आहेत. खजूरामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि थेट साखर असते.  १ किलो खजूरामध्ये सर्वसाधारणपणे  ३००० कॅलरीस असतात.  

 

  • एका संशोधनात असे आढळून आले आहे की खजूर खाल्याने पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. 

 

  • खजूर रात्रभर पाण्यात भिजऊन ठेवा व सकाळी भिजवलेला खजूराचा चुरा करून खा, हे हृदयासाठी उपयोगी आहे. याच्यात पोट्याशियम असते, हे हृदय झटका व इतर हृदय संबंधी होणाऱ्या आजारांचा धोका कमी करतो. खजूर खाल्याने आपला कोलेस्ट्रोल नियंत्रित राहते.

 

  •  महिलांमध्ये आढळणाऱ्या अशक्तपणात खजूर उपयोगी आहे. खजूर खाल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. खजूर खाल्याने तत्काळ  ऊर्जा मिळते. 

Web Title: Dates are very useful fruit and gives instant energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.