रेस्टॉरंट स्टाइल मशरूम मंच्यूरियन रेसिपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 07:59 PM2019-02-18T19:59:05+5:302019-02-18T20:04:18+5:30

मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. मशरूममध्ये अनेक महत्त्वपूर्ण खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते.

Chinese mushroom manchurian recipe in marathi | रेस्टॉरंट स्टाइल मशरूम मंच्यूरियन रेसिपी!

रेस्टॉरंट स्टाइल मशरूम मंच्यूरियन रेसिपी!

Next

मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. मशरूममध्ये अनेक महत्त्वपूर्ण खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. तसेच मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅटीऑक्सिडंटही असून यामुळे शरीरातील वाढत्या वयाच्या लक्षणं दिसत नाहीत. याव्यतिरिक्त मशरूममध्ये कोलीन नावाचं एक खास पोषक तत्त्व आढळतं. जे स्नायूंची सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे आहारामध्ये मशरूमचा समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. 

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा जेवणामध्ये स्टार्टर म्हणून तुम्ही एखाद्या तिखट किंवा चटपटीत पदार्थाच्य शोधात असाल तर तुम्ही मशरूमपासून तयार करण्यात येणारा मशरूम मंच्यूरियन ट्राय करू शकता. ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना? पण चिंता नका करू. तुम्ही घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट स्टाइल मशरूम मंच्यूरियन तयार करू शकता. 

साहित्य :

मशरूम- 250 ग्रॅम, आलं-लसणाची पेस्ट - 1 चमचा, कॉर्नफ्लॉर - 4 ते 5 चमचे, मैदा- 2 चमचे, सोया सॉस -1 चमचा, मीठ चवीनुसार, पाणी 2 कप, तेल - तळण्यासाठी.

ग्रेवीसाठी लागणारं साहित्य :

लसणाची पेस्ट - 1 चमचा, आलं, हिरवी मिरची - 2, कांदा - 1, कांद्याची पात , सोया सॉस - 1 चमचा, चिली सॉस - 1 चमचा, टोमॅटो सॉस, मीठ चवीनुसार

कृती :

- मशरूम व्यवस्थित स्वच्छ करून ते छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. 

- एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉर, मैदा, आलं-लसणाची पेस्ट एकत्र करून घ्या. त्यानंतर यामध्ये सोया सॉस आणि पाणी एकत्र करून घट्ट बॅटर तयार करा.

- पॅनमध्ये तेल गरम करा. जेव्हा तेल गरम होइल तेव्हा मशरूम बॅटरमध्ये डिप करून तेलामध्ये टाकून क्रिस्पी होइपर्यंत फ्राय करा. 

- एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉर थोड्या पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित एकत्र करून बॅटर तयार करा. 

- ग्रेवी तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये ऑइल टाकून गरम करा. त्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लॉर बॅटर, कापलेले कांदा, हिरवी मिरची एकत्र करून परतून घ्या. यामध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस, मीठ, कांद्याची पात एकत्र करून 2 मिनिटांसाठी परतून घ्या. 

- त्यानंतर यामध्ये फ्राइड मशरूम एकत्र करून 2 मिनिटांसाठी शिजवून घ्या. 

- चटपटीत मशरून मंच्यूरियन खाण्यासाठी तयार आहे. 

मशरूम खाण्याचे फायदे :

- मशरूममध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. त्याचा त्वचेसाठी तसेच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो. 

- मशरूममध्ये कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. 

- व्हिटॅमिन 'डी' साठी मशरूम हा उत्तम पर्याय आहे. व्हिटॅमिन 'डी' हाडांच्या मजबुतीसाठी फार गरजेचं असतं. 

- मशरूममध्ये कमी प्रमाणात कोलेस्टेरॉल असते. त्यामुळे मशरूम खाल्यानं फार भूक लागत नाही.

- कॅन्सरच्या पेशींवर आळा घालण्यासाठीही मशरूम उपयुक्त ठरते. एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की, मशरूम खाल्यानं कॅन्सरपासून शरीराचा बचाव होतो.

Web Title: Chinese mushroom manchurian recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.