रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 11:49 AM2019-02-02T11:49:32+5:302019-02-02T11:53:15+5:30

ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.

Benefits of eating walnut or akroad | रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश

रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश

googlenewsNext

ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडला  ब्रेन फूड असंही म्हणत असून मेंदूची शक्ती वाढविण्यासाठीही हे लाभदायक ठरतं. एवढचं नव्हे तर स्मरणशक्तीसाठीही अक्रोड खाणं गुणकारी असतं. त्यामुळे अनेकदा डॉक्टरही अक्रोजचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. हृदयासंबंधित आजारांसाठीही अक्रोड परिणामकारक ठरतं. अक्रोड चा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक इत्यादीं पदार्थांमध्ये केला जातो. 

अक्रोड खाल्ल्याने टेन्शनही दूर पळते असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या या संशोधनातून अक्रोड खाल्याने पुरूषांच्या तणावामध्ये काही फरक पडतो का? यावर अभ्यास करण्यात आला. दररोज मुठभर अक्रोड खाण्यामुळे पुरूषांमध्ये बराचसा तणाव कमी होतो, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणावरही अक्रोड लाभदायक आहे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ, अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड, पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असल्याने त्याच्या नियमित सेवनाने 28 टक्के पुरुषांच्या तणावग्रस्त आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे.

जाणून घेऊया अक्रोड खाल्याने शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत...

- शरीरावर एखाद्या भागामध्ये आपल्याला वेदना, जळजळ होत असेल किंवा सुज आली असेल तर त्या ठिकाणी अक्रोडच्या सालाचा लेप लावा आराम मिळेल.

- अक्रोडची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात.

- रोज अक्रोड खाल्याने शरीरावर होणाऱ्या सफेद डागांची समस्या दूर होते.

- डाएटमध्ये दररोज 5 अक्रोड आणि 15 ते 20 मनुक्यांचा समावेश केला तर अनिद्रेची समस्या दूर होते. अक्रोडमध्ये मेलाटोनिन आढळून येतं जे झोपेसाठी परिणामकारक ठरतं. 

- अक्रोड लिव्हर संबंधित समस्या, थायरॉइड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. 

- अक्रोड हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर दातांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं. 

- अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असतं. त्यामुळे याचं सेवन करणं हदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. 

- अक्रोडमध्ये कॅन्सररोधी गुणधर्म असतात. त्यामध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट असतात, जे कॅन्सर वाढण्यापासून रोखतात. तसेच ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठीही अक्रोड लाभदायक ठरतं. 

- अक्रोड रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी ठेवण्याचं काम करतं. तसेच पचनासाठीही मदत करतं. पोटाच्या समस्यांवरही अक्रोड फायदेशीर ठरतं. एका दिवसामध्ये 2 ते 3 अक्रोड खाल्याने वजन कमी होतं. 

- अक्रोडमध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन-ई आणि प्रोटीन आढळून येतं. याच्या नियमित सेवनाने केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते. 

- गरोदर महिलांसाठी अक्रोडचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. पोटातील बाळाला पोषण पुरविण्यासाठी अक्रोड मदत करतं. 

- अक्रोडच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि शरीराला आवश्यक एनर्जी मिळते. 

- तुम्ही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर अक्रोडचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Benefits of eating walnut or akroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.