केळीच्या पिठामध्ये आहेत वजन कमी करण्याचे गुण, जाणून घ्या इतरही फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 10:52 AM2019-06-08T10:52:37+5:302019-06-08T10:58:22+5:30

केळ्याचं पीठ हे कच्च्या केळीपासून तयार केलं जातं. हे पीठ तुम्हाला वेगवेगळ्या आजारांपासून वाचवण्यासोबतच शरीराला वेगवेगळी पोषक तत्त्वेही देतं.

Banana pulses contain weight loss qualities, know other benefits | केळीच्या पिठामध्ये आहेत वजन कमी करण्याचे गुण, जाणून घ्या इतरही फायदे

केळीच्या पिठामध्ये आहेत वजन कमी करण्याचे गुण, जाणून घ्या इतरही फायदे

Next

(Image Credit : Food Business News)

केळ्याचं पीठ हे कच्च्या केळीपासून तयार केलं जातं. हे पीठ तुम्हाला वेगवेगळ्या आजारांपासून वाचवण्यासोबतच शरीराला वेगवेगळी पोषक तत्त्वेही देतं. केळ्याचं पीठ हे ग्लूटन फ्री असतं. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, हे पीठ त्या लोकांसाठी सर्वात चांगलं आहे ज्यांना ग्लूटेनची अ‍ॅलर्जी आहे. सोबतच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठीही. या पिठामध्ये कॅलरी फार कमी असतात, त्यामुळे याने वजन कमी होण्यास मदत मिळते. या पिठाच्या चपात्या करण्यासाठी यात तुम्हाला थोडं गव्हाचं पीठ मिश्रित करावं लागेल. रागी, ज्वारी आणि बाजऱ्याच्या भाकरींप्रमाणे या पिठाचीही भाकरी केली जाऊ शकते.  चला जाणून घेऊ याचे आणखीही काही फायदे...

(Image Credit : Dr. Axe)

कच्च्या केळीला सोलून ते लिंबाच्या पाण्यात बुडवून धुवा. नंतर केळीचे तुकडे करा. नंतर याचं पीठ तयार करा आणि सुकायला ठेवा. या पिठामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रिसर्वेटिवची गरज नसते. हे पीठ तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पिठात मिश्रित करून कोणतीही डिश तयार करू शकता. या पिठाने तुम्ही केक, बिस्किट हे पदार्थही बनवू शकता. 

व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं

(Image Credit : Global Organics, Ltd.)

केळीचं पीठ हे एखाद्या सुपरफूडपेक्षा अजिबात कमी नसतं. यातून तुम्हाला व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात मिळतं. तसेच यात आयर्न आणि पोटॅशिअमही सुद्धा भरपूर असतं. डोळ्यांसोबत केल आणि रक्ताची कमतरता असेल तर हे पीठ फारच फायदेशीर ठरतं.  

ब्लड शुगर करतं कंट्रोल

पिकलेली केळी खाणं शुगर असलेल्यांनी टाळलं पाहिजे, पण कच्च्या केळीचं पीठ त्यांची शुगर कंट्रोल करतं. कारण कच्च केळं पिकण्याआधीच पीठ होतं, त्यामुळे यात शुगरचं प्रमाण फार कमी असतं. दुसरं यात ग्लूटेन नसतं. त्यामुळेच यात नैसर्गिक शुगरचं प्रमाणही कमी असतं. स्टार्च फ्री असल्याकारणाने हे सहजपणे पचतं सुद्धा आणि याने ब्लड शुगरही वाढत नाही. 

कोलेस्ट्रॉल कमी करतं

(Image Credit : Verywell Health)

केळ्यामध्ये खनिज तत्त्व भरपूर असतात. यात व्हिटॅमिन ई सोबतच झिंक, मॅग्नेशिअम आणि मॅग्निजही भरपूर प्रमाणात असतं. तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की, दोन चमचे केळ्याच्या पिठातून तुम्हाला ७ केळींच्या बरोबरीत पोषक तत्व मिळतात. हे सर्व खनिजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर असतात. सोबतच हे हृदयासाठीही फायदेशीर असतं. 

लहान मुलांनाही फायदेशीर

(Image Credit : Zovon.com)

केळीच्या पिठामध्ये पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर आढळतं, त्यामुळे हे वाढत्या मुलांसाठीही फायदेशीर ठरतं. याने शरीराला एनर्जी मिळते आणि कॅलरी कमी असल्याने याने फार नुकसानही होत नाही.

वजन कमी करण्यास मदत

(Image Credit : Eat This, Not That!)

केळीच्या पिठामध्ये केवळ कॅलरीच कमी नाही तर हे ग्लूटेन फ्री असल्याकारणाने मैद्याप्रमाणे नुकसानही करत नाही. यात फायबरही भरपूर असतं. त्यामुळे उशीरापर्यंत पोट भरलेलं राहतं आणि पचण्यासाठीही चांगलं असतं. एक्सरसाइज केल्यानंतर या पिठाचं सेवन केलं गेलं तर याने वजन कमी करण्यासही मदत मिळेत. सोबतच शरीराला एनर्जीही खूप मिळते. तसेच याने इम्यून सिस्टीमही मजबूत होते.

(टिप : वरील लेखात देण्यात आलेले सल्ले आणि टिप्स केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. याचा वापर करायचा असेल तर आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण प्रत्येकाला हे फायदेशीर ठरेल असं नाही.)

Web Title: Banana pulses contain weight loss qualities, know other benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.