'हे' पदार्थ कितीही खा; अजिबात वाढणार नाही वजन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 03:19 PM2019-02-18T15:19:25+5:302019-02-18T15:20:07+5:30

अनेकदा आपल्याला थोड्या थोड्या वेळाने काहीतरी हटके पदार्थ खाण्याती इच्छा होत असते. नवनवीन पदार्थांची चव चाखण्यापासून ते स्वत:ला आवरू शकत नाहीत.

5 food items with negative calorie helps in weight loss naturally | 'हे' पदार्थ कितीही खा; अजिबात वाढणार नाही वजन!

'हे' पदार्थ कितीही खा; अजिबात वाढणार नाही वजन!

Next

अनेकदा आपल्याला थोड्या थोड्या वेळाने काहीतरी हटके पदार्थ खाण्याती इच्छा होत असते. नवनवीन पदार्थांची चव चाखण्यापासून ते स्वत:ला आवरू शकत नाहीत. पण खूप खाल्याने जेव्हा या लोकांचं वजन वाढतं तेव्हा मात्र या लोकांना आपल्या या सवयीचा पश्चाताप होऊ लागतो. असं तुमच्यासोबतही होत असेल तर यावर वेळत काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. 

गोंधळून जाऊ नका... आम्ही तुम्हाला अजिबात उपाशी राहायला सांगणार नाही. फक्त तुम्ही जे पदार्थ खात असाल त्यामध्ये थोडे बदल करणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला काही असे खाद्य पदार्थ खाणार आहोत, ज्यांमध्ये निगेटिव्ह कॅलरी असतात. या पदार्थांच्या सेवनाने वजन नाही वाढत. तर ते कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हे पदार्थ तुम्हाला पाहिजे तेवढे खाऊ शकता. 

काय आहे नेगेटिव्ह कॅलरी?

नेगेटिव्ह कॅलरी फूड म्हणजे असे पदार्थ जे पचण्यासाठी कॅलरीजची गरज लागत नाही. म्हणजेच या पदार्थांचा आहात समावेश केल्याने अजिबात वजन वाढणार नाही. जेव्हा तुम्ही हे पदार्थ खाता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कॅलरी बर्न होण्यास सुरुवात होते. ज्या खाद्यपदार्थांमध्ये कोणतच पोषक तत्व असत नाही, त्यापदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असतं. या कॅलरी शरीरामध्ये जमा होतात आणि फॅट्सचे प्रमाण वाढू लागते. जंक आणि गोड पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. 

हे आहेत नेगेटिव्ह कॅलरी फूड

1. सफरचंद 

'अ‍ॅन अ‍ॅपल अ डे; कीप्स डॉक्टर्स अवे' असं आपण नेहमीच ऐकतो. दररोज एक सफरचंद खाल्याने आपला अनेक आजारांपासून बचाव होतो. तसेच यामुळे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये फक्त 50 कॅलरी असतात. त्याचबरोबर सफरचंदामध्ये असणारं 'पेक्टिन' तत्व पचनशक्ती मजबूत करून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. 

2. ब्रोकली

ब्रोकलीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. यामध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट असतात. जे वजन नियंत्रणात ठेवतात. अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट फॅट्स कमी करून वजन कमी करण्यासाठी मदत करतं. 

3. कलिंगड

अनेक लोकांचा गैरसमज असतो की, कलिंगड गोड असतं म्हणून यामध्ये खूप साऱ्या कॅलरी असतील. पण कलिंगड शरीर डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर असतं. यामध्ये कॅलरी कमी असतात. याच्या सेवनाने इम्युनिटी सिस्टीम आणि पचन शक्ती दोन्हींचं आरोग्य उत्तम राहतं. शरीरामधील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठीही मदत करतं. 

4. बटाटा

वजन वाढविण्यासाठी बटाटा खाण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु जर वजन कमी करायचं असेल बटाटे उकडून खाण्याचा सल्ला देण्यात येतो. बटाटे उकडल्याने त्यातील स्टार्च निघून जातं. स्टार्चमध्येच फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. फॅट्स निघून गेल्याने उकडलेल्या बटाट्याचं सेवन करणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

5. काकडी

100 ग्रॅम काकडीमध्ये 16 कॅलरीज असतात. तुम्ही कितीही काकडी खा, त्यामुळे तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. त्यासोबतच काकडीमध्ये खूप सारे मिनरल्स, व्हिटॅमिन, वजन कमी करणारी तत्वही असतात. अशातच वजन कंट्रोल करण्यासोबतच ते कमी करण्यासाठीही काकडी मदत करते. वेट लॉस डाएटमध्ये काकडीचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

Web Title: 5 food items with negative calorie helps in weight loss naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.