आज प्रत्येकाला वाटते की, आपले लाइफस्टाइल उच्चभ्रु असावे. विशेष म्हणजे बहुतांश लोक बॉलिवूड सेलिब्रिटींचे अलिशान बंगले आणि फॅशन स्टाइल पाहून अंचबित होतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपलीही लाइफस्टाइल त्यांच्यासारखी बनविण्याचा प्रयत्न करतात. मात्र बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच लग्झरी लाइफस्टाइलच्याबाबतीत आपले भारतीय क्रिकेटरदेखील मागे नाहीत. इंडियन क्रिकेटर टीमचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या लाइफस्टाइलबाबतीत सर्वांनाच माहित आहे. दिल्लीच्या साधारण घरात राहणारा विराट कोहली आता दिल्लीला शिफ्ट झाला आहे. तिथे त्याचा अलिशान बंगला आहे, ज्याची किंमत ८० करोड रुपये खर्च करुन तयार करण्यात आला आहे.  विराटच्या या बंगल्यात शानदार बेडरुम, हॉल, इम्पोर्टेड फर्नीचर आणि प्रत्येक सुविधांनी परिपूर्ण आहे. असे म्हटले जात आहे की, लग्नानंतर विराट आणि अनुष्का याच घरात राहण्यास जाऊ शकतात.  

Image result for virat anu

असे ऐकण्यात आहे की, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली डिसेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलात भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि बॉलिवूड ब्युटी अनुष्का शर्मा लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. यासाठी डिसेंबरमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यातून विराटने सुट्टी घेतली आहे. एका एप्लीकेशनमध्ये त्याने सुट्टीचे कारण पर्सनल सांगितले आहे. ऐवढेच नाही तर अनुष्काच्या काही जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की डिसेंबर महिन्यात तिला शूटिंग करायचे नाही आहे. त्यामुळे दोघे ही डिसेंबर महिन्यात लग्न करण्याच्या विचारात आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र याचे खरं उत्तर वेळच देईल.  नुकतेच दोघे मान्यवरच्या अ‍ॅडमध्ये एकत्र दिसले होते. या अ‍ॅडची थीम लग्नावर आधारित होती. यात ते दोघे एकमेकांसोबत सात वचन देताना दिसत होते. विराट अनुष्काला लाडाने ‘नुष्की’ या नावाने हाक मारतो. ‘विरूष्का’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जोडीचे प्रेम आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. खरे तर विराट व अनुष्काने ते कधीही लपवलेही नाही.      
Web Title: Virat Kohli will stay in the house after Anuska
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.