सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून व्हॅलेंटाइन डेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तुम्हीही तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी तयार करतचं असाल. पण या तयारीत स्वतःला विसरू नका. म्हणजे, पार्टनरला खूश करण्यासाठी सरप्राइज प्लॅन करताना किंवा गिफ्ट सिलेक्ट करताना तुमच्या लूकबाबत विसरलात तर नाही ना? घाबरू नका. आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्हाला व्हॅलेंटाइनसाठी स्पेशल लूक करण्यासाठी मदत होइल. आम्ही तुम्हाला काही ड्रेसेसचे ऑप्शन्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही ठरवू शकता की, त्यातील कोणता ड्रेस तुमच्यावर सूट होइल... 

स्‍कर्ट 

स्कर्ट असं आउटफिट आहे, ज्यामुळे तुमच्यामध्ये दडलेला खट्याळपणा दिसून येण्यास मदत होते. या व्हॅलेंटाइन डेसाठी खास लूक करण्याचा विचार करत असाल तर स्कर्ट ट्राय करू शकता. लॉन्ग, मिनी किंवा मॅक्सी तुमच्या आवडीनुसार निवड करा. याव्यतिरिक्त स्कर्टचे आणखी काही वेगळे प्रकार आहेत. जसे ए-लाइन, फ्लेयर्ड, प्लेटेड किंवा पेन्सिल स्कर्ट. 

जंपसूट 

जर तुम्ही तुमच्यामध्ये असलेला चुलबुलेपणा समोर आणण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही जंपसूट ट्राय करू शकता. जंपसूटमध्येही अनेक प्रकार येतात. त्यामध्ये ऑफ शोल्डर, प्रिंट आणि पॅटर्न असणारे, अनेक प्रकारांमध्ये आढळून येतात. यांचा रंगही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. 

लेस 

लेस असणारी ड्रेस तुमच्या नाजूक पर्सनॅलिटीला आणखी शोभून दिसतात. हे ड्रेस तुम्ही तुमच्या मूडनुसार निवडू शकता. लॉन्ग स्लीव्सपासून फिगर फिटिंगपर्यंत अनेक प्रकारचे येतात. सर्वच रंगांमध्ये हे फार सुंदर दिसतात पण जर व्हाइट किंवा लाइट शेडमध्ये असेल तर ते आणखी सुंदर दिसतात. 

ट्रेडिशनल 

दिवस कोणताही असो ट्रेडिशनल आउटफिट्स कधीही उठून दिसतात. सर्वच आउटफिट्समध्ये पारंपारिक ड्रेस असा आहे, ज्यामुळे ट्रेडिशनलसोबतच मॉर्डन लूकही मिळतो. ट्रेडिशनल आउटफिटमध्ये तुम्ही ड्रेस किंवा साडीचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. 

पाहूयात बॉलिवूड अभिनेत्रींचे आणखी काही खास लूक्स जे व्हॅलेंटाइनसाठी तुम्ही ट्राय करू शकता :


Web Title: Valentine Day outfit ideas for special look
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.