बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या हटके साड्या यांची क्रेझ कधीच कमी झालेली नाही. साडीसोबत अनेक सेलिब्रिटी एक्सपरिमेंट्स करताना दिसून येतात. सध्या आलिया भट्टचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. आलियाची ही साडी फार सुंदर असून आलियाही या साडीमध्ये गोड दिसत आहे. आलिया आणि सोनम दोघीही आपल्या फॅशन स्टेटस सिंबलसोबत एक्सपरिमेंट करताना दिसत आहेत. अशातच यावेळी आलियाने पिंक कलरची मेटॅलिक साडी वेअर केली आहे. तर सोनमने ब्ल्यू कलरची मेटॅलिक साडी वेअर केली होती. 

आलियाने Grazia India या मॅग्झिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशून केलं असून त्यावेळी तिने ही साडी परिधान केली होती. आलिया या फोटोमध्ये फार ग्लॅमरस दिसत आहे. 

सोनम कपूर आणि राधिका आपटे या दोघींनीही मेटॅलिक फॅब्रिक मटेरियल कॅरी केलं होतं. आलियाच्या आधी सोनम कपूरने मेटॅलिक सारी 2016मध्ये कॅरी केली होती. 

Rimzim Dadu यांचं क्रिएशन असलेल्या या आउटफिट्मध्ये या अदाकारा अत्यंत सुंदर दिसत होत्या. 

बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रीही मेटॅलिक लूक कॅरी करताना दिसून येतात. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकदा साडीसोबत एक्सपरिमेंट करताना दिसून येते. शिल्पानेही मेटॅलिक साडी परिधान केली होती. ज्यामध्ये ती फार सुंदर दिसत होती. 

शिल्पा फक्त साडीसोबतच नाही तर मेटॅलिक फॅब्रिकसोबतही एक्सपरिमेंट करताना दिसून आली होती. शिल्पा यामध्ये क्लासी दिसत होती. 

इतर अभिनेत्रींप्रमाणेच दीपिका पादूकोननेही मेटॅलिक लूक कॅरी केला होता. दीपिकाने लाइट कलरच्या साडीसोबत हेव्ही ज्वेलरी मॅच केल होती. यामध्ये दीपिका हटके दिसत होती. 

आलियाने मेटॅलिक साडी ट्राय करण्याआधी मेटॅलिक फॅब्रिक ड्रेसही ट्राय केले होते. या मेटॅलिक लूकमध्ये चुलबुली आलिया खरचं खूप गोड दिसत होती. 


Web Title: Sonam kapoor or alia bhatt who looks best in metallic sari with their style look
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.