Some tips for attractive personality | आकर्षक व्यक्तिमत्वाच्या काही टिप्स
व्यक्तिमत्व हे जन्मजात असून, ते बदलता येत नसल्याचा आतापर्यंतचा समज होता. परंतु, काही तज्ज्ञांनी हे सिद्ध करुन दाखविले आहे की, अभ्यास व ट्रेनींग ते बदलता येते. याकरिता आपल्याला मेहनत व प्रयत्नाची गरज आहे.आकर्षक व्यक्तिमत्वासाठी या काही टिप्स.
आत्मविश्वास : जीवन जगत असताना, आत्मविश्वास असणे फार गरजेचा आहे. आपल्या ज्या योजना आहेत, त्याचा योग्यप्रकारे प्लॅन बनविणे आवश्यक आहे.तसेच कोणतेही काम असो, त्याचा आत्मविश्वास बाळगवा.  
स्वत: ला ओळखा : सर्वात पहिले  स्वत: ला ओळखणे शिकले पाहीजे. आपल्या सकारात्मक व नकारात्मक बाजू काय आहेत. त्या  सुद्धा विचारात घ्याव्यात. जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेकजण दुसºयांच्या विचाराचे व व्यवहाराचे अनुकरण करतात. परंतु, थोड्या कालावधीसाठी ते ठिक आहे. परंतु, नंतरला त्याचा उपयोग नाही.
बॉडी लॅग्वेज : आपण काहीही न बोलता आपली बॉडी लॅग्वेज समोरच्या  व्यक्तिला सर्व काही सांगत असते. बोलणे, हात मिळवणे, नमस्कार करणे हे सर्व व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याकरिता या गोष्टीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
 सकारात्मक दृष्टीकोन : नेहमी सकारात्मक राहणे हे फार महत्वाचे आहे. नकारात्मक असल्यामुळे आपल्याकडे कुणी येत नाही. परंतु, सकारात्मक असल्याने आपला विचार घेतला जातो.
 स्वभाव :  आपला स्वभाव हा दुसºयावर प्रभाव पाडणारा असावा.
नवीन लोकांना भेटा : आपण जेवढे नवीन लोकांना भेटू तेवढे आपले व्यक्तिमत्वाचा विस्तार होतो. त्यामुळे अधिक जणांना भेटणे गरजेचे आहे.

 
Web Title: Some tips for attractive personality
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.