सध्या सोशल मीडिया काही क्षणात प्रसिद्धी मिळविण्याचे साधन झाले आहे. आपले फोटो, आपले मत किंवा अन्य आपणास जे काही वाटेल ते सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही क्षणातच व्हायरल होऊन ते अगणित लोकांपर्यंत पोहोचते. म्हणून लोकांपर्यंत पोहचण्याचे सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झाले आहे. विशेषत: या माध्यमाचा सेलिब्रिटी चांगल्या पद्धतीने वापर करताना दिसतात. या माध्यमातूनच त्यांना मोठी प्रसिद्धी मिळत असते. अशाच प्रकारे एका नेपाळच्या तरुणीलाही सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळत आहे. अवघ्या दोनच दिवसात इंटरनेटच्या जगतात या तरुणीने लोकांना अक्षरश: वेडे करुन टाकले. एवढ्या कमी कालावधीत तिचे लाखो फॉलोवर्सदेखील तयार झाले. विशेष म्हणजे ही तरुणी तिच्या कामासाठी नव्हे, तर तिच्या सौंदर्यामुळे एवढी प्रसिद्ध झाली आहे. या तरुणीचे नाव अंजना दास असून नेपाळमध्ये राहते. अंजनाने काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अंजना एवढी सुंदर आहे की, काही क्षणातच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आणि एका लहानशा देशाची ही तरुणी काही क्षणातच जगभरात प्रसिद्ध झाली. अंजनाचा बोल्ड अंदाज कोण्या बॉलिवूड किंवा हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसपेक्षा कमी नाही. याच कारणाने ती एवढ्या लवकर फेमस झाली.  * बोल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल 
नेपाळची ही सुंदर मॉडेल आतापर्यंत अपरिचित होती, मात्र आता तिचे नाव आणि तिचे काम सर्वांना परिचित झाले आहे. नेपाळच्या या मॉडेलचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू बनलेले आहेत. शिवाय ती तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर हुकूमत गाजवत आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती एखाद्या बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या अ‍ॅक्ट्रेसपेक्षा कमी नाही.  

अंजना दास मॉडेल तर आहेच, पण तिने काही नेपाळी चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिच्या सौंदर्याची चर्चा आतापर्यंत फक्त नेपाळ पर्यंतच मर्यादित होती, आता मात्र तिच्या सौंदर्याचे चाहते जगभरात निर्माण झाले आहेत. अंजनाचे फोटो कित्येक मॅगजिनमध्ये छापली गेली आहेत. अंजनाने नुकतेच ‘असीमा बियॉन्ड बॉउंड्रीज’ या नेपाळी चित्रपटात केले आहे.  
Web Title: SHOCKING: 'The Nepalese girl made fun of people on social media, but why?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.