मुंबई शहराच्या एकदम मध्यवर्ती भागात म्हणजेच बांद्रा येथे शाहरुखची पत्नी गौरी खानने नुकतेच ‘अर्थ’ रेस्तरॉ सुरु केले असून या रेस्तरॉची सर्वत्र चर्चा आहे. या रेस्तरॉच्या ओपनिंगनिमित्त आयोजित एका खास पार्टीत बॉलिवूडचे सर्व कलाकार उपस्थित होते.विशेष म्हणजे, या अर्थ रेस्तरॉचे इंटीरीअर डिजाईन खुद्द गौरी खानने केले आहे. स्टायलिश आणि विंटेज केलासिक लुक असे दोन्ही मिश्रित इंटीरीअर रेस्तरॉची शोभा अजूनच वाढवतेय. उत्कृष्ट अ‍ॅम्बिअन्ससह चविष्ट जेवण लोकांना मिळेल याची पूर्ण व्यवस्था या रेस्तरॉमध्ये करण्यात आली आहे.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या रेस्तरॉमधील किचन गॅस फ्रि असणार आहे. कुकिंगसाठी येथे कोळसा, लाकूड आणि गरम वाळूचा वापर करण्यात येणार आहे. अमरिंदर साधू हे रेस्तरॉमधील मुख्य शेफ असणार आहेत. 


Web Title: Shahrukh Khan's wife will be surprised to see the inside photo of the restaurant.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.