Rio 2016: Fun Facts | ​रिओ आॅलिम्पिक २०१६ : फन फॅक्टस्

यंदाची आॅलिम्पिक स्पर्धा ब्राझीलमध्ये होणार असून त्यासाठी संपूर्ण देश मोठ्या उत्साहाने ५ आॅगस्टची वाट पाहत आहे. दक्षिण अमेरिका खंडात प्रथमच आॅलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जात आहे. हे औचित्यसाधून जगाला आपले सामर्थ्य, क्षमता आणि आपण सुवर्णभविष्याचे मानकरी आहोत असे ठासून सांगण्यासाठी रिओ प्रशासन आणि नागरिक सज्ज झाले आहेत. दर चार वर्षांनी होणारी आणि खऱ्या अर्थाने जागतिक असणारी ही स्पर्धा ५ ते २१ आॅगस्ट दरम्यान पार पडणार आहे. त्याबद्दलची ही काही महत्त्वपूर्ण आकडेवारी -

* 206 देश ‘रिओ आॅलिम्पिक २०१६’मध्ये सहभागी होणार आहेत.

* खेळाडू आणि अधिकारी मिळून एकूण १७ हजार जण स्पर्धेचा भाग असणार.

* स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन आणि समोराप सोहळा ७८ हजार आसनक्षमतेच्या मॅराकाना स्टेडिअममध्ये होणार.

* आॅलिम्पिक इतिहासात प्रथमच ‘निर्वासितांचा संघ’ आॅलिम्पिकच्या नावाने स्पर्धेत उतरणार.

* ७५ लाख तिकिट विक्रीस उपलब्ध.

* स्पर्धेच्या सोयीसोठी शहरात भूमिगत मेट्रोची १६ किलोमीटरने क्षमता वाढविण्यात आली आहे. आॅलिम्पिकच्या तयारीसाठी करण्यात आलेला हा सर्वात मोठा इनफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ठरला.

* बाह दा तिजुका, डिओडोरो, कोपाकॅबाना बीच आणि मेराकाना आॅलिम्पिक स्टेडिअम या रिओ शहरातील ४ विभागांत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

* संपूर्ण जगातील २५ हजार पत्रकार या खेळाचे वार्तांकन करणार आहेत.

* सुमारे ५ लाख पर्यटक स्पर्धेला भेट देतील असा अंदाज.

Rio

* रिओ शहरतील ६१ टक्के लोकांना वाटते की, आॅलिम्पिक स्पर्धेमुळे शहराला आणि पर्यायाने देशाला लाभ होईल तर २७ टक्के नागरिकांना मात्र स्पर्धेमुळे शहरात कचरा होण्याची भीती आहे.

* खेळाडूंना राहण्यासाठी ‘आॅलिम्पिक ग्राम’मध्ये ३१ टॉवर्स बांधण्यात आले. स्पर्धेनंतर यातील सर्व ३६०४ अपार्टमेंट्सची विक्री करण्यात येणार.

* आॅलिम्पिक ग्रामच्या डायनिंग हॉलमध्ये दरदिवशी ६० जणांच्या जेवण्याची व्यवस्था.

* ५ जंबो जेट विमाने बसू शकतील एवढा भव्य असा हा डायनिंग हॉल आहे.

* आॅलिम्पिक ग्राममध्ये एकूण ८० हजार खुर्च्या असणार.

* संपूर्ण स्पर्धेत एकूण ४०० फुटबॉल वापरण्यात येणार आहेत.

* यजमान ब्राझीलने फुटबॉलमध्ये अद्याप एकही आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेले नाही.

* आॅलिम्पिकमध्ये गोल्फ खेळाचा शेवटचा सामावेश ११२ वर्षांपूर्र्वीमध्ये करण्यात आला होता.

* ब्राझीलचे दोन-दोन राष्ट्राध्यक्ष आॅलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार.

cnxoldfiles/strong> कंडोम्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. म्हणजे प्रत्येकी ४१ कंडोम्स किंवा दिवसाला दोन.
Web Title: Rio 2016: Fun Facts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.