Ram Gopal Verma controversial tweet on MLA Grapefruit | आमदार अंगूरलतांवर राम गोपल वर्मांचं वादग्रस्त ट्वीट

आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर आमदार बनलेल्या अभिनेत्री अंगूरलता डेका यांच्यावर सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक असं ट्वीट केलं आहे, ज्यामुळे वादंग माजण्याची शक्यता आहे.मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर राजकारणात पाऊल ठेवलेल्या अंगुरलता डेका यांच्याबाबत राम गोपाल वर्मांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “जर आमदार असे दिसायला लागले, तर राजकारणात ‘अच्छे दिन’ आले आहेत, थँक यू अंगूरलताजी, थँक यू मोदीजी. पहिल्यांदाच मला राजकारण आवडलं आहे”

अंगूरलता या बतद्रोवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या गौतम बोरा यांना तब्बल 6 हजार मतांनी पराभूत केलं. या मतदारसंघात मुस्लीम मतं अधिक असल्याचं बोललं जात आहे. शिवाय, बांगलादेशातून आलेल्यांची संख्याही अधिक आहे.

अंगूरलता डेका यांनी अनेक बंगाली आणि आसामी सिनेमांमध्ये काम केलं असून, आसामी अभिनेता आकाशदीपसोबत लग्न केलं आहे. आकाशदीप मोनी हा दीप नावाने ओळखला जातो. आकाशदीप आणि अंगुरलता या दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे.
Web Title: Ram Gopal Verma controversial tweet on MLA Grapefruit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.