OMG: Not too much English-speaking girls, Baba! | OMG : ​जास्त इंग्रजी बोलणाऱ्या मुली नको रे बाबा !

सध्या इंग्रजी बोलण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असून बऱ्याच हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये सर्रास इंग्रजीचा वापर करण्यात येत आहे. त्यात संवादापासून चित्रपटांचे बरेच शिर्षक इंग्रजी असल्याचे आढळले आहे. एकंदरीत आपण इंग्रजीला ‘विंडो आॅफ दी वर्ल्ड’ समजतो. त्यामुळे सध्या इंग्रजीत बोलणे केवळ ट्रेंड नव्हे तर गरज होऊन बसले आहे. तुम्ही कुठेही जाता, इंटरव्युव देता किंवा दहा लोकांमध्ये बसलेले असता तेव्हा तुमची योग्यता व बुद्धिमत्ता यांची पारख तुमच्या इंग्रजीवरून केली जाते. यासाठी बरेचजण इंग्लिश स्पिकिंगचे कोर्सही जॉईन करतात. मात्र एका नव्या संशोधनात, पुरुषांना जास्त इंग्रजी बोलणाऱ्या मुली आवडत नाहीत असे आढळून आले आहे.  

नुकतेच एका सर्वेक्षणात आढळले आहे की भारतीय पुरूषांना आजूनही साध्या-सरळ घरगुती मुली आवडतात. इंग्रजी बोलणाऱ्या मुली त्यांना आवडत नाही.  
पुरुषांचे मत आहे की इंग्रजी बोलणाऱ्या मुली आत्मनिर्भर असतात. परंतु त्यांच्यामध्ये फार अहंकार असतो. त्या स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. त्या आपले कुटुंब व नवऱ्यापेक्षा स्वत:ला वरचढ समजतात. या सर्वेक्षणात पुढे आलेली आणखी एक बाब म्हणजे अशाच मुलांना इंग्रजी बोलणाऱ्या मुली आवडतात ज्यांना स्वत:ला चांगले इंग्रजी बोलता येते. 

तसे पाहिले तर बदलत्या काळासोबत इंग्रजी बोलणे आवश्यकच आहे मात्र ज्यांना इंग्रजी येत नाही ते स्वत:ला कमकुवत समजतात.  
Web Title: OMG: Not too much English-speaking girls, Baba!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.