-Ravindra More
बॉलिवूड स्टार्स आपल्या लाइफस्टाइलसाठी एका वेळी लाखो रुपये खर्च करतात. विशेष म्हणजे असे काही स्टार्स आहेत जे घड्याळीवर लाखो नव्हे तर करोडो रुपये खर्च करतात. बॉलिवूडमध्ये असा एक स्टार आहे, ज्याची घड्याळ करोडो रुपयाची आहे. आणि विशेष म्हणजे अमिताभ-शाहरुख पेक्षाही त्याच्या घड्याळीची किंमत जास्त आहे. जाणून घेऊया कोण आहे तो स्टार आणि त्याच्या घड्याळीची किंमत. 

Related image

* इमरान हाशमी
बॉलिवूडचा सीरियल किसर म्हणजेच इमरान हाशमी याला घड्याळींची मोठी आवड आहे. त्याच्याजवळ बऱ्याच महागड्या बॅ्रंडच्या घड्याळी आहेत. मात्र सध्या तो जी घड्याळ वापरत आहे, तिची किंमत  सुमारे २.१ करोड रुपये आहे. विशेष म्हणजे या घड्याळीचे ३२ पिसेज बनतात. आणि भारतात ती घड्याळ फक्त इमरान हाशमी जवळच आहे. 

Related image

*अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चनला देखील घड्याळींची मोठी आवड आहे. अभिषेक जेव्हा पार्ट्यांमध्ये जातो तेव्हा जी घड्याळ त्याच्या हातात दिसते तिची किंमत सुमारे ८ लाख रुपये आहे. * सैफ अली खान
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान जवळ घड्याळींचे मोठे कलेक्शन आहे. सैफ घड्याळींचा एवढा फॅन आहे की, तो प्रत्येक तिसऱ्या दिवशी घड्याळ बदलतो. विशेषत: सैफ जी घड्याळ नियमित वापरतो तिची किंमत ७.१ लाख रुपये आहे.   * शाहरुख खान
शाहरुख खानलादेखील घड्याळी खूप आवडतात. तो सध्या जी घड्याळ वापरत आहे तिची किंमत सुमारे ३.१ लाख रुपये आहे. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात त्याच्या हातात जी घड्याळ घड्याळ दिसली तिची किंमत १२ लाखापेक्षा जास्त होती. 

Image result for amitabh bachchan with wrist watch

* अमिताभ बच्चन
बॉलिवूडचा शहंशाह सुपरस्टार अमिताभ बच्चन जी घड्याळ वापरतात तिची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे, मात्र सध्या जे मॉडल त्यांच्या हातात आहे त्याची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे.


  
* ऋतिक रोशन
ऋतिक रोशन कधीही आपल्या स्टाइलसोबत तडजोड करीत नाही. ऋतिक एका इंटरनॅशनल घड्याळीच्या कंपनीचा ब्रॅँड अ‍ॅम्बॅसिडर आहे. त्याच्या जवळ जी घड्याळ आहे तिची किंमत सुमारे ३.२ लाख रुपये आहे. 
Web Title: OMG: This is the most expensive watch in Bollywood, this star is worth 2 crores!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.