The number of suicides increased in the United States | ​अमेरिकेत वाढले आत्महत्येचे प्रमाण
​अमेरिकेत वाढले आत्महत्येचे प्रमाण
अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आत्महत्या करण्याचे प्रमाण गेल्या तीस वर्षांमध्ये सर्वाधिक वाढले आहे.

अमेरिकेत वाढते आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेता तेथील आरोग्य संघटना चिंता व्यक्त करत आहेत. 1999 ते 2014 या काळात जवळपास सर्वच वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण 24 टक्क्यांनी वाढले आहे.

दर एक लाख माणसांमागे 13 जण आत्महत्या करत आहेत. विशेष म्हणजे एकट्या 2014 मध्ये महिलांच्या तुलनेत तिप्पट पुरुषांनी आपले जीवन अर्ध्यावर सोडण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला.

45 ते 60 या वयोगटातील स्त्री-पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये सर्वाधिक वृद्धी झाली आहे. पुरुषांमध्ये 43 टक्के तर महिलांमध्ये 63 टक्के हे प्रमाण आहे.

विशेष म्हणजे 75 वर्षांच्या पुढील वयोगटात आत्महत्या वृद्धी दर घटला आहे. परंतु सवार्धिक आत्महत्या करणाºया लोकांची संख्या याच वयोगटात आहे. आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या पुरुषांमध्येदेखील आत्महत्या करण्याच्या दर कमी झाला आहे.

पुरुष बंदूकीद्वारे (55.4 टक्के) तर महिला विषप्राशन (34.1 टक्के) करून आत्महत्या करतात करतात.

मागच्या तीस वर्षांत झालेल्या या वृद्धीमागे अनेक कारणे आहेत. गरीब आणि अशिक्षित श्वेत लोक आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच नशेच्या पदार्थांचे (ड्रग्स) अतिसेवन व मानसिक असंतुलन हे कारणेसुद्धा महत्त्वाची आहेत. संशोधनातून असे दिसून आले की, अविवाहित लोकांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे.
Web Title: The number of suicides increased in the United States
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.