देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मल्टीकलर दुपट्टा ट्रेंडमध्ये; तुम्हीही करू शकता ट्राय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 07:22 PM2018-12-26T19:22:37+5:302018-12-26T19:27:32+5:30

जर तुम्ही फॅशन ट्रेन्ड्स  religiously फॉलो करत असाल तर तुम्हीदेखील एक गोष्ट आवर्जुन नोटीस केली असेल की, या दिवसांमध्ये लाइट कलरच्या प्लेन ड्रेसवर मल्टीकलर दुपट्ट्याचा ट्रेन्ड पुन्हा एकदा फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ घालत आहे.

Multicolor bandhni dupatta like priyanka chopra is in trend do buy them | देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मल्टीकलर दुपट्टा ट्रेंडमध्ये; तुम्हीही करू शकता ट्राय

देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मल्टीकलर दुपट्टा ट्रेंडमध्ये; तुम्हीही करू शकता ट्राय

Next

जर तुम्ही फॅशन ट्रेन्ड्स  religiously फॉलो करत असाल तर तुम्हीदेखील एक गोष्ट आवर्जुन नोटीस केली असेल की, या दिवसांमध्ये लाइट कलरच्या प्लेन ड्रेसवर मल्टीकलर दुपट्ट्याचा ट्रेन्ड पुन्हा एकदा फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ घालत आहे.

मग तो व्हाइट कलरवर सलवार कुर्ता किंवा चुडीदार कुर्ता असो किंवा पिंक, ब्लॅक, गोल्डन कलरचा कुर्ता. यासर्व कलर्सवर मल्टीकलर बांधणी किंवा लहरिया दुपट्टा फार सुंदर दिसतो. तसेच फार कमी कष्ट घेऊन तुम्ही सुंदर लूक मिळवू शकता. 

प्रियांका-दीपिकाकडून घ्या टिप्स 

दीपिका पादुकोण जेव्हा लग्नानंतर इटलीवरून मुंबईला परतली, त्यावेळी तिने गोल्डन कलरच्या प्लेन सूटसोबत रेड कलरचा वर्क असणारा दुपट्टा परिधान केला होता. तेच प्रियंका चोप्रानेही लग्नासाठी जोधपूरला जाताना क्रिम कलरच्या फ्रंट स्लिट कुर्ता आणि पलाझोसोबत मल्टीकलर बांधणी दुपट्टा परिधान केला होता. या दोन्ही अॅक्ट्रेसचा हा लूक सिम्पल असण्यासोबतच फार सुंदर दिसत होता. 

मार्केटमध्ये अनेक वरायटी उपलब्ध

सध्या लग्नसराई सुरू असून जर तुम्हीही एखाद्या लग्नासाठी एक सिम्पल पण हटके लूक ट्राय करण्याचा विचार करत आहात का?

तुम्ही दीपिका आणि प्रियंकाला फॉलो करू शकता. सध्या फॅशन वर्ल्डमध्ये हा दुपट्टा ट्रेन्ड करत असून बाजारातही अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत.

तुम्ही तुमच्या आवडीचे आणि बजेटनुसार मल्टीकलर दुपट्टा खरेदी करू शकता. 

Web Title: Multicolor bandhni dupatta like priyanka chopra is in trend do buy them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.