Meghraj Bhosale, president of All India Marathi Film Corporation | ​अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज भोसले

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीत समर्थ पॅनलची सरशी झाली असून पॅनल मधून निर्माते मेघराज भोसले यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी छायाचित्रण विभागातील धनाजी यमकर यांची निवड झाली. समर्थ पॅनलच्या उमेदवार आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर विजयी झाल्या तर अभिनेता गटातून विजय पाटकर विजयी झाले आहेत. पाटकर यांच्या विजयाला अभिनेते सुशांत शेलार यांनी आव्हान देत फेरमताची मागणी केली होती, मात्र ही मागणी फेटाळण्यात आली. दोघांमध्ये १० ते १२ मतांचा फरक होता. म्हणून ही लढत चुरशीची ठरली. 

तसेच समर्थ पॅनलच्या चैताली डोंगरे रंगभुषा विभागातून, बाळा जाधव कामगार विभागातून,  शरद चव्हाण ध्वनीरेखक विभागातून आणि निर्मिती व्यवस्था-व्यवस्थापकीय यंत्रणा विभागातून संजय ठुबे हे विजयी झालेत. 

Web Title: Meghraj Bhosale, president of All India Marathi Film Corporation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.