Line parliament ... | ​रेखा संसदेत...


अभिनेत्री व राज्यसभा सदस्य रेखा शिवाजी गणेशन यांनी आज मंगळवारी संसदेत हजेरी लावली. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज प्रथमच त्या सभागृहात आल्या. क्रिम रंगाची साडी आणि डोळ्यांवर सनग्लास अशा थाटात त्यांनी संसद परिसरात प्रवेश केला. त्यांना बघतात, मीडियाचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले. पत्रकारांना पाहून रेखांनी अभिवादन केले. राज्यसभेतील सीट क्रमांक ९९ वर त्या बसल्या. अगदी काही मिनिटे सभागृहाच्या कामकाजात भाग घेतल्यानंतर त्या काँग्रेस सदस्या रेणुका चौधरी यांच्या आसनापर्यंत आल्या. याठिकाणी दोघीही  हितगुज करताना दिसल्या. यानंतर काही मिनिटांनी रेणुका यांच्यासोबतच रेखाबाहेर पडल्या. यापूर्वीच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही त्यांनी केवळ एक दिवस हजेरी लावली होती. रेखा या राज्यसभेच्या मनोनीत सदस्य आहेत.


Web Title: Line parliament ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.