Holi 2019 : होळीसाठी हे आउटफिट्स ठरतील बेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:19 PM2019-03-19T17:19:43+5:302019-03-19T17:20:13+5:30

होळी खेळण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा आपण कोणतीही काळजी न करता होळी खेळतो. परंतु, होळीच्या दिवशी सर्वांना सतावणारी काळजी म्हणजे, कपड्यांची. कपड्यांना रंग लागला तर त्याचे डाग कपड्यांवरून जाता जात नाहीत.

Holi special 2019 know what to wear and what not on the festival of colors | Holi 2019 : होळीसाठी हे आउटफिट्स ठरतील बेस्ट!

Holi 2019 : होळीसाठी हे आउटफिट्स ठरतील बेस्ट!

Next

(Image Credit : Deccan Chronicle)

होळी खेळण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा आपण कोणतीही काळजी न करता होळी खेळतो. परंतु, होळीच्या दिवशी सर्वांना सतावणारी काळजी म्हणजे, कपड्यांची. कपड्यांना रंग लागला तर त्याचे डाग कपड्यांवरून जाता जात नाहीत. तसेच रंगांमध्ये असणारे केमिकल्स कपड्यांना खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात. अशातच आवश्यक असतं की, होळी खेळण्यासाठी योग्य कपड्यांची निवड करावी. जास्तीत जास्त लोक होळीसाठी खास जुने कपडे काढून ठेवतात. खरं तर हा उत्तम पर्याय आहे कपड्यांना रंगांपासून वाचवण्याचा. परंतु, हल्ली होळीसाठी असलेल्या पार्टीसाठी फॅशनेबल आणि स्टायलिश दिसण्याचा ट्रेन्ड आहे. त्यामुळे लोक होळीसाठी खास व्हाइट कलरचे कपडे वेअर करतात. खरं तर लोक होळीसाठी व्हाइट रंग निवडतात कारण त्यावर इतर रंग उठून दिसतात. 

होळीसाठी खास आउटफिट्स :

1. होळीच्या रंगांपासून बचाव करण्यासाठी जुने कपडे परिधान करा. त्यामुळे नवीन कपडे खराब होणार नाहीत. याव्यतिरिक्त कोणताही सण हा ट्रेडिशनल लूकमध्येच चांगला वाटतो. त्यामुळे यावेळी होळीसाठी तुम्ही एथनिक थीम ट्राय करू शकता. 

2. तुम्ही गरज असेल तर होळी पार्टीसाठी अभिनेत्री रेखाचा 'रंग बरसे' गाण्यातील लूक ट्राय करू शकता. चिकनकारी कुर्त्या आणि लेगिन्स वेअर करून तुम्ही क्लासी लूक फॉलो करू शकता. तुम्ही कुर्त्यासोबत स्कार्फ किंवा दुपट्टा ट्राय करू शकता. 

3. होळी रंगांचा उत्सव आहे, मग का नाही कपड्यांसोबतही एक्सपरिमेंट करण्यात यावं? होळीसाठी तुम्ही थोड्या हटके स्टाइल्सचे कपडे, जसे सलवार-कुर्ता किंवा वेस्ट्रन आउटफिट्स ट्राय करू शकता. 

4. होळीसाठी कपडे निवडताना हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की, या सणासाठी कोणतं फॅब्रिक उत्तम आहे. कॉटन फॅब्रिक होळीसाठी उत्तम मानलं जातं. मग कितीही कडक ऊन असो, कॉटन उत्तम ठरतं. 

5. स्टायलिश दिसण्याचा विचार करत असाल तर टॉप किंवा कुर्त्याला प्लाझो किंवा शॉर्ट्ससोबत परिधान करू शकता. आजकाल कुर्त्यासोबत धोती-पॅन्ट वेअर करण्याचाही ट्रेन्ड आहे. 

6. होळीसाठी साडी वेअर करणं हा उत्तम पर्याय आहे. तुम्हीही साडी वेअर करण्यासाठी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींकडून टिप्स घेऊ शकता. पण लक्षात ठेवा की, तुम्हाला साडी व्यवस्थित आणि आत्मविश्वासाने कॅरी करावी लागेल. 

काय परिधान कराल?

होळी खेळण्यासाठी जे आउटफिट्स वेअर करणार असाल ते जास्त टाइट असू नये. तसेच डीप नेकलाइन परिधान करू नका. होळी पार्टीसाठी स्कर्टही वेअर करू नका. जे कपडे वेअर कराल ते व्यवस्थित असतील याची खात्री करा. 

Web Title: Holi special 2019 know what to wear and what not on the festival of colors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.