Father's Day Special: Life of the Father in Life! | ​Father's Day Special : आयुष्यात वडिलांचे स्थान वेगळेच !

-Ravindra More 
फादर्स डे संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही जर घरात तर काही चित्रपट किंवा डिनरचे आयेजन करुन बाहेर साजरा करतात. असे म्हटले जाते की, १६ व्या शतकात ‘पिता’ शब्द अस्तित्वात आला होता. वडिलांबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस प्रत्येकासाठी एक विशेष दिवस असतो. 

खरं पाहिले तर आपल्या आयुष्यात वडिलांचे स्थान आगळेवेगळेच असते. त्यांच्या छत्रछायेत आपण लहानाचे मोठे होतो. या जगात वावरण्या इतकं बळ मिळतं ते वडिलांनी दिलेले प्रेम, शिकवण, संस्कारामुळेच. एखाद्या वेळी वेळात वेळ काढून वडिलांसोबत बसा आणि त्यांच्या गोष्टी, त्यांचे विचार, अनुभव, व्यतित केलेले आयुष्य, त्यासंबंधी जुडलेल्या घटना हे सर्व ऐका. यावरुन समजेल की, वडिलांची भूमिका किती कठीण असते. त्यांच्या या अनुभवातून आपणासही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. 

फादर्स डे वडिलांबद्दल आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगात साजरा केला जातो. काही देशांमध्ये हा दिवस जूनच्या तिसऱ्या रविवारी, तर काही देशांमध्ये इतर दिवशी साजरा केला जातो. 

फादर्स डेची सुरुवात विसाव्या शतकात झाली. या दिवसाची सुरुवात करण्याचा उद्देश म्हणजे वडिलांनी आपले जे पालनपोषण केले त्याप्रति आदर-सन्मान करणे होय. यादिवशी मुले वडिलांना गिफ्ट देतात, वडिलांसाठी स्पेशल जेवणाची व्यवस्था करतात शिवाय काही कौटुंबिक कार्यक्रमाचेही आयोजन करतात. 

जगात सर्वप्रथम फादर्स डे पश्चिम वर्जिनियाच्या फेयरमोंटमध्ये ५ जुलै १९०८ मध्ये साजरा करण्यात आला होता. त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पहिली फादर्स चर्च आजदेखील सेन्ट्रल यूनाइटेड मेथोडिस्ट चर्चच्या नावाने फेयरमोंट मध्ये स्थित आहे. 

६ डिसेंबर १९०७ मध्ये पश्चिम वर्जिनियामध्ये एका अपघातात सुमारे २१० वडील मृत्यू झाले होते. त्यांच्या सन्मानार्थ फादर्स डेचे आयोजन ग्रेस गोल्डन क्लेटन नावाच्या महिलेने केले होते.  

आजच्या फादर्स डे निमित्त आपण वडिलांसाठी काहीतरी नवीन बनविण्याचे आयोजन करु शकता. त्यात आपण त्यांना न कळत त्यांच्या सर्व मित्रांना लंच किंवा डिनरसाठी घरी बोलवू सरप्राईज देऊ शकता. तुमचे वडिल आॅफिसमधून घरी आल्यानंतर त्यांना फादर्स डे विश करुन चकित करु शकता. 

एक वडील आणि मुलांचे नाते खरच वेगळे असते.

वडिलांच्या सन्मानार्थ जगातील सर्वात वृद्ध वडील म्हणून एका शेतकऱ्याला गौरविण्यात आले आहे, ज्यांचे नाव नानू राम जोगी आहे. ९० वर्षीय जोगी २००७ मध्ये आपल्या २१ व्या मुलांचे वडील बनले होते. 

Also Read : ​Father's Day Special : वडिलांना द्या जगातला परमोच्च आनंद !
 
Web Title: Father's Day Special: Life of the Father in Life!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.