Enjoy video calling on Whatsapp! | ​व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉलिंगचा आनंद लुटूया...!

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी अशी आता आपण व्हॉट्सअ‍ॅपवर फक्त चॅटिंगच नव्हे तर व्हिडिओ कॉलिंगचा देखील आनंद घेऊ शकता. जर आपण व्हॉट्सअ‍ॅप बीटा अ‍ॅप इन्स्टॉल केले असेल तर लगेच व्हिडिओ कॉलिंग फीचर वापरु शकता. व्हॉट्सअ‍ॅपने  मंगळवारी व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरु केल्याचे जाहीर केली असून  तरुणाई आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारा व्हिडिओ कॉलिंग करु शकते. 

असा करा व्हिडिओ कॉल

* सर्वप्रथम व्हाट्सअ‍ॅप ओपन करा
* यानंतर कॉन्टॅक्टवर क्लिक करा
* आपणास ज्यांना व्हिडिओ कॉल करायचा आहे त्याच्या नावावर क्लिक करा
* यानंतर स्क्रीनवर सर्वात वरती बनलेल्या फोन आयकॉनवर क्लिक करा
* यात समोर आलेल्या दोन आॅप्शनपैकी व्हिडिओ कॉलिंगवर क्लिक करा
* यानंतर आपला कॉल कनेक्ट होईल

टिप- समोरच्या यूजरकडे व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जन डाउनलोड असेल तरच व्हिडिओ कॉलिंग शक्य आहे. 

जर अ‍ॅण्ड्रॉयड यूजर जवळ व्हॉट्स अ‍ॅपचे बीटा व्हर्जन नसेल आणि या फीचरचा लगेच आनंद घ्यायचा असेल तर, यूजरला व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा प्रोग्रॅमसाठी साइन अप करावे लागेल. 
साइन अप करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा-
* गूगल प्लेमध्ये जाऊन व्हॉट्स अ‍ॅप सर्च करा
* यानंतर व्हॉट्सअ‍ॅपची गूगल प्ले लिस्टिंग ओपन करा
* जे पेज आपल्या समोर ओपन असेल त्याला खाली स्क्रॉल करा
* येथे आपणास बीटा टेस्टर दिसल्यानंतर त्याच्यात ‘आ एम इन’ टाईप करा
* यानंतर जी स्क्रीन ओपन होईल त्यात खात्री करा
* यानंतर गूगल प्ले स्टोरच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टिंग पेजवर वापस जा
* येथे आपणास व्हॉट्स अ‍ॅप बीटा व्हर्जन अपडेट करण्याचा पर्याय दिसेल
* आता याला अपडेट करा
ही प्रक्रिया केल्यानंतर आपण व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. 
Web Title: Enjoy video calling on Whatsapp!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.