do you know why anushka sharmas skirt is trending | अनुष्काच्या स्कर्टची फॅशन वर्ल्डमध्ये चलती; जाणून घ्या काय आहे स्पेशल!
अनुष्काच्या स्कर्टची फॅशन वर्ल्डमध्ये चलती; जाणून घ्या काय आहे स्पेशल!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या हटके फॅशन फंड्यामुळे नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक गोष्टीत काहीतरी हटके करण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असतो. अशातच ती नेहमी या गोष्टीची काळजी घेते की तिचा लूक इतरांपेक्षा वेगळा असण्यासोबतच तो स्टायलिश आणि कम्फर्टेबलही असावा. सध्या ती आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. 

अनुष्काचा फॉक्स लेदरसह झिप असलेला स्कर्ट

प्रमोशनदरम्यान अनुष्काने वेगळ्या स्टाइलचा स्कर्ट घातला असून सध्या फॅशन वर्ल्डमध्ये त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर कनिका गोयलने डिझाइन केलेला पिंक कलरचा फॉक्स लेदरचा स्कर्ट या दिवसंमध्ये चर्चेत आहे. या स्कर्टवर फ्रंट साइडला ब्लॅक झिप लावण्यात आली आहे. हा स्टायलिश आणि हटके स्कर्ट अनुष्काने  निमिश शाहच्या लेबल असलेल्या कलरफुल जंपर टॉपसोबत वेअर केला होता. तर तिने पायामध्ये स्निकर्स घातले होते. 

फॅशन वर्ल्डमध्ये ट्रेन्डींगमध्ये आहे हा स्कर्ट

लॅक्मे फॅशन विक विंटर फेस्टिव्हल 2018 दरम्यान फॅशन डिझायनर कनिका गोयलने आपला हा स्कर्ट सादर केला होता. आता अनुष्का शर्माने घातल्यामुळे फॅशन वर्ल्डमध्ये सध्या या स्कर्टची चलती आहे. 


Web Title: do you know why anushka sharmas skirt is trending
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.