Cannes 2019 : व्हायरल झाला दीपिकाचा टर्बन लूक; किंमत जाणून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 06:20 PM2019-05-21T18:20:15+5:302019-05-21T18:21:01+5:30

दीपिका पादुकोण (Deepika Padukone)ने सलग चौथ्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटसाठी हजरी लावली. सध्या कान्स फिल्म फेस्टिवल 2019 गाजवल्यानंतर दीपिका पादुकोण मुंबईत परतली असली तरिही तिच्या कान्समधील रेड कार्पेट लूकची चर्चा मात्र काही केल्या थांबेना.

Deepika padukone cannes 2019 turban look cannes film festival 2019 | Cannes 2019 : व्हायरल झाला दीपिकाचा टर्बन लूक; किंमत जाणून व्हाल अवाक्

Cannes 2019 : व्हायरल झाला दीपिकाचा टर्बन लूक; किंमत जाणून व्हाल अवाक्

Next

दीपिका पादुकोण (Deepika Padukone)ने सलग चौथ्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटसाठी हजरी लावली. सध्या कान्स फिल्म फेस्टिवल 2019 गाजवल्यानंतर दीपिका पादुकोण मुंबईत परतली असली तरिही तिच्या कान्समधील रेड कार्पेट लूकची चर्चा मात्र काही केल्या थांबेना. खरं तर दीपिकाचे कान्समधील सर्वच लूक फार क्लासी आणि हटके होते. त्यातील बो ड्रेसपासून ते लेटस्ट ट्यूल गाउल लूकपर्यंत दीपिका पादुकोणने आपल्या सर्व लूक्सनी अनेक बड्या अभिनेत्रींना टक्कर दिली. त्यातील काही लूक्स चाहत्यांनी डोक्यावर घेतले पण काही लूक्समुळे त्यांची निराशाही झाली. दीपिका पादुकोण (Deepika Padukone Cannes 2019) ची स्टायलिश शालिनी नथानीने कान्समध्ये अनेक एकापेक्षा एक लूक्स सादर केले परंतु या सगळ्या लूक्सपैकी लाइम ग्रीन गाउन (नियॉन ग्रीन) लूकसोबत मॅच केलेल्या हेअर एक्सेसरीज विशेष गाजल्या. 

दीपिका पादुकोणने कान्सच्या 5व्या लूकमध्ये ट्यूल गाउनसोबत टर्बन (हेडरॅप) वेअर केला होता. त्यामुळे दीपिकाचा लूक आणखी सुंदर दिसत होता. दीपिका पादुकोणने पहिल्यांदा टर्बन (Turban) लूक रेड कार्पेटवर वेअर केला होता. या एक्सपरिमेंट्स सोशल मीडियावर फार चर्चेत होत्या. 

रेड कार्पेटवर वेअर केलेली प्रत्येक गोष्ट फार महागडी असती. डिझायनर ड्रेसेसपासून ज्वेलरीपर्यंत प्रत्येक वस्तूची किंमत लाखो रूपयांमध्ये असते. त्याचबरोबर स्टार्सनी वेअर केलेली छोट्यातली छोटी वस्तूही फार किमती असते. दीपिकाने वेअर कलेला हा टर्बनही फार महागडा होता. हा फ्लोरल हेडरॅप 585 पाउडंस म्हणजेच, 52 हजार रूपयांचा होता. 

पाहा 52 हजार रूपयांच्या टर्बनचे फोटो...

दीपिका पादुकोणने वेअर केलेला निऑन ग्रीन गाउन इटॅलियन फॅशन डिझायनर गियॅबतिस्ता वॅली (Giambattista Valli) यांनी डिजाइन केला आहे. हेडरॅप किंवा टर्बन लग्जरी हेडवेअर ब्रँड एमिनी बॅक्सनडेल (Emily Baxendale) होता. ज्वेलरी डिझायनर लेबल  लॉरिएन स्केवार्ट्ज (Lorraine Schwartz) यांनी केलं होतं. हिल्स डिझाइन ब्रँड स्टुअर्ट विट्जमॅन (Stuart Weitzman) यांनी केलं होतं. हा संपूर्ण लूक स्टायलिश शालिनी नथानीने स्टाइल केला होता. मेकअप संध्या शेखर (Sandhya Shekar) आणि हेअर गॅबरियल जियॉर्ज (Gabriel Georgiou) ने तयार केला होता. 

दरम्यान, याआधी मिस यूनिवर्स ठरलेली बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) नेही वर्ष 2018मध्ये टर्बन लूक ट्राय केला होता. तिने डिझाइनर भूमिका आणि ज्योतीसाठी शो-स्टॉपर ग्रीन लेयर्ड गाउन आणि टर्बन वेअर केला होता. 

 

Web Title: Deepika padukone cannes 2019 turban look cannes film festival 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.