Color jeans dei attractive 'dressing style'! | ​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’!

आजची फॅशन फिक्र तरुणाई प्रत्येक इव्हेंटसाठी वेगवेगळी स्टाईल ट्राय करत असते. त्यासाठी तरुण-तरुणींची सर्वाधिक पसंत असेल तर जीन्सला. विशेष म्हणजे जीन्स निवडताना आपण नेहमी ब्लू आणि ब्लॅक हे दोनच आॅप्शन जास्त निवडतो. पण सध्या तरुणाईसाठी 'कलर जीन्स' हा भन्नाट आॅप्शन आहे. आपण एखाद्या कुर्त्यावर लेगिन्स मॅच करतो तसच या कलर जीन्सचाही वापर करता येतो. चला जाणून घेऊया कलर जीन्स वापरताना काय काळजी घ्यावी.

* जीन्स घेताना फिटिंग अतिशय महत्त्वाची असते. कधीही कमरेची साईज बघूनच जीन्स घ्यावी, त्यातच कलर जीन्स घेताना आपल्या बॉडी टाईप नुसारदेखील पसंत करावी. खासकरून ब्लू जीन्स स्किनी फिट व रेग्युलर फिटिंग मध्ये उपलब्ध असते. अशा जीन्स सर्व बॉडी टाईप वर शोभून दिसतात.

* कलर जीन्स निवडताना आपल्या स्किनटोनचा देखील विचार करावा. तसेच आपण त्यावर शर्ट, टी-शर्ट कि अजून एखादा टॉप घालतोय हे लक्षात घ्यावे. त्यानंतर कुठल्या ठिकाणी जसे आॅफिस, आऊटिंग कि पार्टीला जाताना त्यानुसार वापरावे. आपल्या स्किनटोन शी साजेसे कलर डेनिम निवडावी कारण अनेक कलर्सची रेंज बाजारात उपलब्ध आहेत.

* जीन्सची निवड करताना आपण कोणत्या टॉप किंवा शर्ट वर घालणार आहोत याचा विचार करावा. आॅफिससाठी जर डार्क रंगाची जीन्स निवडली तर एखादा चेक्स किंवा प्लेन टॉप किंवा टि-शर्ट वापरावा. फिक्या रंगाची जीन्स असल्यास त्यावर फ्लोरल प्रिंटचा एखादा टॉप फ्रेश लूक देतो. न्यूट्रल कलर जसे की सफेद, ग्रे अशा कलरच्या टॉपवेयर डार्क कलरच्या जीन्सवर सूट होतात. जेव्हा तुम्ही एखादी जीन्स निवडता, तेव्हा ती केवळ फिटिंग किंवा कलरनुसारच नाही, तर डिझाईन व स्टायलिंग याची उत्तम सांगड असणेही महत्त्वाचे असते. 
Web Title: Color jeans dei attractive 'dressing style'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.