रवींद्र मोरे 

जळगाव (खान्देश) येथील दिया महाजन ही चिमुकली वयाच्या ३ वषार्पासून मोडेलिंग स्पर्धेत रॅम्पवॉक करीत असून तिने राज्यस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दिया आता सहा वषार्ची असून तिची एका ‘मल्टिटॅलेन्टेड रिअ‍ॅल्टी टीव्ही शो’साठी भारतातील पहिली मेगा स्पर्धक  म्हणून निवड झालेली आहे.... 
लहानपणापासूनच म्हणजेच वयाच्या २.५ वर्षाची असताना दियाला मॉडेलींग करण्याची आवड आणि त्या आवडीला आई आणि वडिल विनय महाजनांनी प्रोत्साहन दिले.  दियाने आतापर्यंत अनेकदा राज्यस्तरीय मॉडेलींग स्पर्धेत सहभागी होत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

एकदा डान्स क्लासमध्ये डान्स शिकत असताना काही तरुण मॉडेल्स रॅम्पवॉकचा सराव करताना दियाने पाहिले आणि मॉडेलिंग करण्याची इच्छा तिने आईवडिलांजवळ व्यक्त केली. त्यानंतर मॉडेलिंग कोरिओग्राफर काजल पाटील हिच्या मार्गदर्शनाने जळगावमध्ये आयोजित राज्यस्तरीय मॉडेलिंग स्पर्धेत रॅम्पवॉक करण्यासाठी सहभागी झाली आणि या स्पर्धेत दियाने आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही पटकावले. आजपर्यंत दियाने अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि बक्षिसेही मिळविले आहेत.
 
विशेष म्हणजे ‘बेटी बचाओ...’ या विषयावर आधारित मराठी लघुचित्रपट ‘लाडकी’ यात दियाने लहानशी पण प्रभावी भूमिका साकारली आहे. 
या चिमुकल्या मॉडेल दियाला ‘लोकमत सीएनएक्स’तर्फे भावी करिअरसाठी हार्दिक शूभेच्छा....!!!
Web Title: Chimukuli model provided Rampur !!!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.