Brother brother and bik bik .. | ​भाई भाई आॅन बाईक बाईक..

बॉलिवूडमधले दोन कट्टर प्रतिस्पर्धी अचानक एका इफ्तार पार्टीमुळे एकत्र आले आणि एकमेकांचे गोडवे गायायला लागले. सलमान आणि शाहरुख दोघेही सुपरस्टार सायकलिंग करतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एक उत्सुकतेचा विषय ठरत आहे. शाहरुखने सलमानसोबतचा हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. गुरुवारी रात्री शाहरुख-सलमानने थोडा मोकळा वेळ काढला आणि मुंबईच्या रस्त्यांवर सायकलिंगचा मनसोक्त आनंद लुटला. हा फोटो एसआरकेने सकाळी शेअर केला आणि सोशल मीडियावर तो लगेच व्हायरल झाला.
‘भाई भाई आॅन बाईक बाईक. प्रदुषण शून्य. भाई म्हणतो मायकल लाल सायकल लाल’असे वेगळे कॅप्शनही शाहरुखने फोटोला दिले आहे. 
Web Title: Brother brother and bik bik ..
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.