Be smart watching movies | बिनडोक सिनेमे पाहून व्हा स्मार्ट

मसालापट आणि मनोरंजनाच्या नावाखाली आपल्याकडे ‘बिनडोक’ सिनेमे बनवले आणि दाखवले जातात. ‘मार्इंडलेस’, ‘तर्कहीन’ अशा विशेषणांनी उल्लेख केल्या जाणाऱ्या या चित्रपटांना कितीही दूषणं दिली तरी काही फरक पडत नाही. पण अशाच ‘बी’ आणि ‘सी’ ग्रेड चित्रपटांचे अजबच वैशिष्ट्य समोर आले आहे.

बिनडोक म्हणवले जाणारे असे सुमार चित्रपट आग्रहाने पाहणारे लोक ‘स्मार्ट’ असतात. कमी खर्चात आणि सुमार दर्जाच्या कथेवर आधारित अशा कमी गुणवत्तेच्या सिनेमांचा चाहता हा सामन्यपणे अधिक हुशार असतो.

जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर एम्पायरिकल एस्थेटिक्स’चे सिनेअभ्यासक केव्यान सार्कोष केलेल्या अध्ययनातून असे दिसून आले की, तथाकथितरीत्या सुमार दर्जाचे मानले जाणारे सिनेमे आवडणाऱ्या लोकांमध्ये सकारात्मकता अधिक असते.

rascals

सार्कोष यांनी फेसबुक व अशा सुमार दर्जाच्या चित्रपटांविषयीच्या फोरम्सवर सक्रीय असणाऱ्या ३७२ जणांचा आॅनलाईन अभ्यास केला. त्यामध्ये अशा प्रकारचे सिनेमे आवडणारे ८४ टक्के लोक हे पदवीधर होते. याचा अर्थ की ते उच्च शिक्षित होते. आवडीने असे सिनेमे पाहण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची विनोदीशैली आणि निव्वळ मनोरंजन. ‘थर्ड ग्रेड’ चित्रपटांमध्ये बिग बजेट व्यावसायिक सिनेमांप्रमाणे तंत्र आणि अभिरुची नसते.

याची कारणीमीमांसा करताना ते सांगतात की, असे चाहते वैविध्यपूर्ण कलाप्रकारांचा आस्वाद घेण्यास उत्सुक असतता. पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाण्याकडे त्यांचा कल असतो. मेनस्ट्रीम सिनेमांपासून काही तरी वेगळं, काही तरी हटके पाहण्याचा आणि त्याचा कलास्वाद घेण्याची वृत्ती जोपासणारे लोक हे पर्यायाने अधिक स्मार्ट असतात.

म्हणजे येथून पुढे तुमच्या मित्राने ‘टुकार’ सिनेमा  पाहण्याचा आग्रह केला तर त्याला ‘थर्ड क्लास’ म्हणून हिणवू नका. काय सांगता, तो तुमच्यापेक्षा अधिक हुशार असेल.
Web Title: Be smart watching movies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.